गेल्या वर्षी अॅपलने भारतात मॅन्युफॅक्चरिंग पार्टनर फॉक्सकॉनमध्ये हँडसेटचे चाचणी उत्पादन सुरू केले होते. कंपनी भारतात आधीच आयफोन ११ आणि आयफोन १२ तयार करत आहे. आता अॅपलच्या नवीनतम आयफोन १३ मॉडेलचे उत्पादन देखील सोमवारी सुरू झाले आहे. पीटीआयने वृत्त दिले आहे की, अॅपलने चेन्नईतील फॉक्सकॉन प्लांटमध्ये आयफोन १३ चे उत्पादन सुरू केले आहे. यापूर्वी पहिला आयपोन मॉडेल आयफोन SE भारतात बनवला गेला होता, ज्याची घोषणा कंपनीने २०१७ मध्ये केली होती. अॅपलने स्मार्टफोन निर्माता फॉक्सकॉन आणि विस्ट्रॉन यांच्याशी करार केला आहे. या कंपन्या भारतात आयफोन असेंबल करण्यासाठी भागीदार आहेत. गेल्या वर्षी भारतात आयफोन विक्रीमध्ये तेजी दिसून आली आहे. प्रीमियम फोनमध्ये ४४ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. देशांतर्गत स्मार्टफोन उत्पादनाला चालना देण्यासाठी उत्पादन-लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेअंतर्गत फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉनसह १६ कंपन्यांना २०२० मध्ये सरकारने मंजूरी दिली आहे. या तिन्ही कंपन्यांनी पुढील पाच वर्षांत भारतात एकूण सुमारे ६,८०० कोटी गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा