Banglore Electricity Bill Payment Scam : ऑनलाइन फसवुकीचे प्रकार खूप वाढले आहेत. बनावट क्युआर कोड, लिंक पाठवून लोकांना गंडा घातल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. फसवुकीची एक घटना बंगळुरू येथे घडली आहे. वीज बील न भरल्याचे सांगत व्यक्तीकडून चक्क ४.९ लाख रुपये लुटल्याचा प्रकार घडला आहे. बंगळुरूतील चामराजापेठ येथील अरविंद कुमार यांच्यासोबत ही घटना घडली.

द हिंदूच्या अहवालानुसार, कुमार यांनी फसवणुकीप्रकरणी शनिवारी पश्चिम विभाग सायबर गुन्हे पोलिसांकडे ऑनलाइन घोटाळ्याची तक्रार केली आहे. अहवालात, कुमार यांनी सांगितले की, त्यांनी BESCOM (बंगळुरू इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लिमिटेड) अधिकारी म्हणून सांगणाऱ्या व्यक्तीचा फोन उचलला. फोन करणाऱ्याने कुमारला सांगितले की, त्यांचे वीज बिल थकीत आहे आणि ताबडतोब न भरल्यास वीज पुरवठा बंद केला जाईल. तेव्हा कुमार यांनी वीज बिल कसे भरायचे असे विचारले असताना फोन करणाऱ्याने त्यांना टिम व्ह्युवर क्विक सपोर्ट मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी लिंक पाठवली. कुमार यांनी अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर फसवणूक करणाऱ्यांना त्यांच्या बँक खात्याचे तपशील मिळाले आणि त्यांनी कुमार यांच्या खात्यातील पैसे त्यांच्या खात्यात वळती केले. सायबर भामट्यांनी कुमार यांच्या खात्यातून ४.९ लाख रुपये लुटले.

Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार
Cheating with the lure of a young woman in Ganjajmun Nagpur news
गंजाजमुनात मौजमजा करायला आला अन् सुंदर तरुणीच्या आमिषाने फसला
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
mahvitran no hike in vehicle fares suppliers warned protest
निवडणुकीच्या धामधुमीत वीज यंत्रणा विस्कळीत होणार? महावितरणमधील वाहन पुरवठादार…

(संकटापूर्वी सज्ज व्हा, कोविड १९ Booster Dose टाळू नका, ‘असे’ करा ऑनलाइन बुक)

टिम व्ह्युवर अ‍ॅप हे युजरला दुरस्थपणे स्मार्टफोन किंवा इतर उपकरणे पाहण्यात मदत करण्यासाठी विकसित करण्यात आले आहेत. मात्र, सायबर भामट्यांनी त्याचा वापर फसवणूक करण्यासाठी केला. कुमार यांनी अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर फसवणूक करणाऱ्यांना त्यांच्या स्मार्टफोनचा अ‍ॅक्सेस मिळाला आणि त्यांनी कुमार यांच्या स्मार्टफोनमधील बँक खात्यासंबंधी तपशील मिळवून हा गंडा घातला.

अशा घोटाळ्यांपासून कसे सुरक्षित राहायचे?

सदर प्रकरणात पीडितला कॉल आला होता, मात्र इतर घटनांमध्ये लोकांना वीजबिल संबंधी एसएमएस आला होता. मेसेज व्हॉट्सअ‍ॅप किंवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवण्यात आला होता आणि त्यात कार्यालयाशी संपर्क साधण्यासाठी एक संपर्क क्रमांक किंवा फिशिंग लिंक होती जिच्या माध्यमातून फसवणूक करणारे पीडितच्या स्मार्टफोनला हॅक करायचे.

वीज बिलसंबंधी येणारे एसएमएस खरे आहे की खोटे हे समजण्यासाठी पुढील गोष्टी तपासा.

(यावर्षी WhatsApp मध्ये करण्यात आले ‘हे’ बदल; यातील तुमच्या आवडीचे फीचर कोणते?)

  • तुमच्या स्मार्टफोनवर तुम्हाला वीज बिलाशी संबंधित मेसेज कुठे आला आहे ते तपासा. सर्व सरकारी अधिकारी नोंदनीकृत मोबाईल क्रमांकावर सूचना पाठवतात.
  • तुम्हाला तातडीने वीज बिल भरावे लागेल असे सांगणारा कॉल किंवा मेसेज आला असेल तर सावध व्हा. लोकांना विचार करायला वेळ मिळू नये आणि ते लवकर जाळात अडकावे यासाठी फसवणूक करणाऱ्यांकडून घाई केली जाते. असे कॉल किंवा मेसेज आल्यास सतर्क राहा.
  • मेसेज काळजीपूर्वक वाचा आणि तुम्हाला ज्या क्रमांकावरून फोन आला आहे तो तपासा. मेसेजमधील व्याकरणाच्या चुका देखील तपासा.
  • वीज बिल थकित असल्यास वीज मंडळाशी किंवा पुरवठादारांशी संपर्क साधा.