तामिळनाडूमध्ये एका विचित्र घटनेमध्ये पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी रात्री घडलेल्या या प्रकारामध्ये ३८ वर्षीय पतीने पत्नी सोशल मीडियावरील रिल्स बनवण्यात बराच वेळ वाया घालवते या रागातून तिची हत्या केली. तिरुपपूर जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडला असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमर्थलिंगम असं आरोपीचं नाव असून मृत महिलेचं नावं चित्र असं आहे. हे दोघेही तिरुपपूरमधील सालीम नगर येथे वास्तव्यास होते. हातावर पोट असणारा अमर्थलिंगम मजूरीचं काम करतो. थेनामाम पल्लयाम येथील भाजी मंडईमध्ये अमर्थलिंगम हमाल आहे. चित्रा ही एका कापड कारखाण्यामध्ये काम करायची. तिला सोशल मीडियावर रिल्स बनवण्याची सवय होती. टीकटॉक आणि इन्स्टाग्रामसारख्या माध्यमांवर ती रिल्स बनवून पोस्ट करायची. मात्र तिची ही सवय पतीला खटकायची. यावरुन अनेकदा दोघांमध्ये वादही झाले होते, असं ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

चित्रा सोशल मीडियावरील रिल्ससाठी फार वेळ वाया घालवते असं अमर्थलिंगमचं म्हणणं होतं. अनेकदा तो भांडणात हे बोलूनही दाखवायचं. सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात फॉलोअर्स आणि संपर्कांमधून माणसं जोडली गेल्याने चित्राने अभिनयामध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला. तिने चेन्नईमधील कापड कारखान्यातील नोकरी दोन महिन्यांपूर्वी सोडली. इन्स्टाग्रामवर तिचे ३३ हजार ३०० हून अधिक फॉलोअर्स आहेत.

मागील आठवड्यामध्ये मुलीच्या लग्नानिमित्त चित्रा मूळ घरी म्हणजेच तिरुपपूरमधील सालीम नगर आली होती. मात्र ती लग्नानंतर पुन्हा चेन्नईला जाण्यासाठी निघाली तेव्हा तिला अमर्थलिंगमने विरोध केला. याच विषयावरुन दोघांमध्ये रविवारी रात्री मोठा वाद झाला. चित्राने सोशल मीडियावर रिल्स पोस्ट करण्याचा नाद सोडून द्यावा आणि अभिनय क्षेत्रात करियर करण्याचा विचारही सोडून द्यावा असं अमर्थलिंगमचं म्हणणं होतं. याच वादामधून दोघांमध्ये हाणामारी झाली. रागाच्याभरात अमर्थलिंगमने शालीने चित्राचा गळा आवळला. गळा आवळल्याने चित्रा बेशुद्ध पडली. घाबरलेल्या अवस्थेतच अमर्थलिंगम चित्राला बेशुद्धावस्थेत सोडून घरातून पळून गेला. नंतर चित्राचा मृत्यू झाला. अमर्थलिंगमने आपल्या मुलीला आपण चित्रावर हल्ला केल्याची माहिती फोनवर दिली.

चित्राची मुलगी आईला पाहण्यासाठी घरी पोहोचली तेव्हा चित्राचा मृतदेह घरात आढळून आला. तिने पोलिसांना याबाबतीत माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्या. त्यानंतर अर्थलिंगमला पेरुमन्नालुरुमधून अटक केली.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man kills wife for spending too much time making social media reels in tn tiruppur held scsg