लास वेगास येथे CES (Consumer Electronics Show 2023) टेक इव्हेन्ट होणार आहे. दोन वर्षे हा शो व्हर्च्युअल पद्धतीने झाला होता. आता मात्र या शो ला प्रत्यक्षरित्या भेट देता येणार आहे. दिनांक ५ जानेवारी ते ८ जानेवारी या कालावधी दरम्यान Consumer Electronics Show सुरु होईल. या काळात Sony, Samsung, LG, AMD, Intel, NVIDIA यांसारखे प्रमुख ब्रँड ग्राहकांसाठी नवनवीन उत्पादने लाँच करतील अशी अपेक्षा आहे. अनेक ब्रँड्सनी या कार्यक्रमापूर्वीच त्यांच्या उत्पादनांची पहिली झलक दाखवली आहे. Consumer Electronics Show हा २०२३ या वर्षातील सर्वात मोठा tech eventआहे. यानंतर आणखी एक मोठा Mobile World Congress 2023 हा टेक इव्हेन्ट फेब्रुवारी महिन्यात होणार आहे.

Samsung

CES 2023 मध्ये सॅमसंगकडून नवीन स्मार्टफोन्स लाँच झालेले पाहता येतील. CES 2023 मध्ये लाँच होणारी उत्पादने ही MWC 2023 मध्ये देखील सादर केली जाणार आहेत. यावतिरिक्त Samsung लॅपटॉप, स्मार्ट रेफ्रिजरेटर आणि घरगुती उपकरणे यांचा समावेश आहे.

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
chris evans back to marvel films
‘कॅप्टन अमेरिका’ फेम अभिनेता क्रिस एव्हान्सचं मार्व्हल सिनेमात पुनरागमन; ‘या’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
Best Web Series of 2024
२०२४ मधील गाजलेल्या वेब सीरिजची यादी, तुम्ही पाहिल्यात का ‘या’ कलाकृती?

LG

LG ने CES २०२३ मध्ये लॉन्च होणाऱ्या उत्पादनाचा टीझर देखील जारी केला आहे. LG वर्ल्ड प्रीमियर देखील CES 2023 च्या एक दिवस आधी म्हणजेच 4 जानेवारी रोजी होणार आहे. या उत्पादनांशिवाय कंपनी OLED चे नवीन तंत्रज्ञान देखील सादर करू शकते. याशिवाय LG नवीन स्मार्टफोन कॅमेरा, साउंडबार आणि स्पीकर लाँच करू शकते.

हेही वाचा : Consumer Electronic Show 2023: सर्वात मोठ्या टेक इव्हेन्टमध्ये सॅमसंग करणार ‘हे’ चार नवीन मॉनिटर्स लाँच

Sony

CES 2023 मध्ये सोनी कंपनी मोठ्या घोषणा सुद्धा करू शकते. ज्यात त्यांनी VR 2 लाँच करणे अपेक्षित असून LG आणि Samsung प्रमाणेच, Sony देखील काही नवीन स्मार्ट टीव्ही आणि होम थिएटर सिस्टीम प्रदर्शित करेल अशी अपेक्षा आहे.

Dell

Dell CES २०२३ मध्ये gaming laptops घोषणा करणार आहे. ज्यात नेक्स्ट जनरेशनमधील Alienware X मालिका आणि लॅपटॉपची Alienware M मालिकालाँच होऊ शकते. लाँच होणारा लॅपटॉप हा आधीच्या लॅपटॉपपेक्षा स्लिम असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : FLIPCART वर स्वस्त दरात मिळतोय GOOGLE चा ‘हा’ फोन

Acer

Acer कंपनी नेक्स्ट जनरेशन प्रदर्शित करू शकतो. ज्यात नवीन गेमिंग लॅपटॉप , creator laptops आणि business laptops यांचा समावेश असणार आहे. हे लॉपटॉपमध्ये Intel and AMD आधुनिक हार्डवेअरच्या वापर करण्यात येईल.

Intel

12 व्या Intelकोर प्रोसेसरच्या तुलनेत Intel higher clock speeds and higher core counts ची सिरीज लाँच करणार आहे. यात entry-level NVIDIA and AMD laptop GPU विरुद्ध स्पर्धा होऊ शकते.

Story img Loader