MapMyIndia अॅप हे भारतातील सर्वाधिक लोकप्रिय डिजिटल नकाशा अॅप्सपैकी एक आहे. MapMyIndia ने त्याच्या मॅपल्स अॅपसाठी ‘जंक्शन व्ह्यू’ नावाचे एक नवीन फिचर लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या नवीन फिचरमुळे वाहनचालकांना छेदरस्ते, उड्डाणपूल आणि रस्त्यांतील फाटे सुरक्षितपणे शोधण्यास मदत करणार आहे. शिवाय या अॅपमध्ये रस्त्यात असणारे छेदरस्ते, उड्डाणपूलांचे 3D फोटो दाखवणार आहे.
हेही वाचा- Tech क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्यांना ‘Google’चे सीईओ सुंदर पिचाईंचा सल्ला, म्हणाले तंत्रज्ञान हे केवळ..
‘जंक्शन व्ह्यू’ फिचरच्या डेटाबेसमध्ये विविध जंक्शनचे हजारो फोटो समाविष्ट केले आहेत. सध्या हे फिचर दिल्ली, नोएडा, कोलकाता, गुडगाव, पुणे, मुंबई, हैदराबाद, बंगलोर, लुधियाना, चेन्नई यासह भारतातील अनेक प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध असून MapMyIndia अॅप वापरकर्ते त्याचा लाभ घेत आहेत. ड्रायव्हर्सना चिन्हांकित लेन आणि उड्डाणपुल, आत आणि बाहेर प्रवेश करण्याचे बोर्ड पुढे येणाऱ्या रस्त्यांची पुर्वकल्पना देण्यासह छेद रस्ते शोधण्यास देखील हे अॅप मदत करणार आहे.
शिवाय लोकांना प्रवासात रस्ते शोधणं सोपे करणं हेचे मॅपल्सचे उद्दिष्ट असल्याचंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. हे अॅप इतर लोकप्रिय नेव्हिगेशन अॅप्स Waze आणि Google नकाशा प्रमाणेच काम करते. मॅपल्स हे अॅप विशेषत: भारतासाठी बनवले आहे. मॅपल्स हे रस्त्यांचे अचूक नेव्हिगेशन, आवाजाद्वारे सूचना, त्यामध्ये दिशा सागण्यासह स्थानिक परिसरात रस्त्यांवर काही अडचणी असतील. ट्रॅफिकची समस्या असेल तर ती या अॅपद्वारे समजते. सध्या हे अॅप Android आणि iOS डिव्हाइससाठी उलबद्ध आहे.