Mark Zuckerberg : मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी अॅमेझॉनचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांना मागे टाकत जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीचा किताब पटकावला आहे. मार्क झुकरबर्ग यांची एकूण संपत्ती २०६.२ अब्ज डॉलरच्या घरात पोहोचली आहे. त्यांच्या पुढे आता केवळ टेस्लाचे मालक एलॉन मस्क आहेत. मार्क झुकरबर्ग त्यांनी काही दिवसांपूर्वीच २०० अब्ज डॉलर्स संपत्तीचा टप्पा पार केला होता. त्यानंतर आता त्यांनी जेफ बेझोस यांना मागे टाकत हा विक्रम रचला आहे.

हेही वाचा – Mark Zuckerberg : “करोनाकाळात ती चूक केल्याचा आता पश्चात्ताप होतोय”, फेसबुकच्या मार्क झुकरबर्गला उपरती

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, मार्क झुकेरबर्ग एकूण संपत्ती २०६.२ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. तर ॲमेझॉनचे माजी मुख्या कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांची संपत्ती २०५.०१ अब्ज डॉलर्स आहे. ब्लूमबर्गच्या ताज्या अहवालानुसार जेफ बेझोस आता तिसऱ्या स्थानावर आहेत. मार्क झुकरबर्ग यांच्या पुढे आता केवल टेस्लाचे मालक एलॉन मस्क आहेत. त्यांची एकूण संपत्ती २५६ अब्ज डॉलर इतकी आहे. महत्त्वाचे म्हणजे मार्क झुकरबर्ग आणि एलॉन मस्क यांच्या संपत्तीत केवळ ५० अब्ज डॉलर्सचे अंतर आहे.

हेही वाचा – WhatsApp ने अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी आणले भन्नाट फीचर! चुटकीसरशी शोधता येतील कोणतेही चॅट्स!

मेटाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीतही वाढ होत असल्याचे सांगितलं जात आहे. मेटाच्या शेअर्समध्ये जानेवारीपासून जवळपास ६८ टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. मेटामध्ये मार्क झुकरबर्ग यांची जवळपास १३ टक्के भागीदारी आहे. झुकेरबर्ग यांनी २०१४ मध्ये फेसबुकची सुरुवात केली होती. त्यानंतर २०२१ मध्ये त्यांनी त्यांच्या कंपनीचं नाव बदलून मेटा असं केलं होतं. आज फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटा प्लॅटफॉर्म अंतर्गत चालवले जात आहेत.