फेसबुक आणि इंस्टाग्राम सध्या भारतात मोठ्या प्रमाणात वापरले जाते. या सोशल मीडियावरील अॅपचा वापर शहरातील लोकच नव्हे तर गावागावातील लोक सुद्धा आता वापर करु लागली आहेत.  मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी नुकतेच फेसबुक-इन्स्टाग्राम या सोशल मिडिया प्लॅटफाॅर्मसाठी Meta Verified लाँच केले आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. हे कंपनीचे सबस्क्रिप्शन मॉडेल आहे, ज्यासाठी मार्क झुकरबर्गने सांगितले आहे की वापरकर्त्यांना दरमहा सुमारे १,००० रुपये शुल्क द्यावे लागेल. फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी हे शुल्क आकारण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलीकडेच ट्विटरने ब्लू सबस्क्रिप्शनची घोषणा केली होती. यासह, वापरकर्ते चार्ज घेऊन अतिरिक्त फायदे घेऊ शकतात. यामध्ये नावासमोर ब्लू टिक किंवा व्हेरिफाईड बॅज मिळणे हा सर्वात मोठा फायदा आहे. बरेच लोक याकडे स्टेटस सिम्बॉल म्हणून पाहतात. त्याचाच फायदा आता कंपन्या घेत आहेत.

(हे ही वाचा : एकाच वेळी WhatsApp अन् Instagram वापरायचे आहेत? पाहा काय आहे प्रोसेस )

मस्कने ट्विटरपासून केली सुरुवात

आतापर्यंत फेसबुक-इन्स्टाग्राम किंवा ट्विटरवर केवळ प्रसिद्ध लोकांनाच ब्लू टिक्स दिली जात होती. हे खात्याची शुद्धता दर्शवते. मात्र यात बदल करताना मस्कने कंपनीचा सबस्क्रिप्शन प्लॅन घेणाऱ्यांना ब्लू टिक द्या असे सांगितले.

फेसबुकवर ब्लू टिकसाठी शुल्क

आता Meta ने देखील असाच एक प्लॅन जाहीर केला आहे. याच्या मदतीने युजर्स पैसे देऊन ब्लू टिक मिळवू शकतात. मात्र, यासाठी त्यांना सरकारने जारी केलेले ओळखपत्रही दाखवावे लागणार आहे. हे सध्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सादर करण्यात आले आहे.

यासाठी कंपनी सुमारे एक हजार रुपये आकारत आहे. यामुळे बनावट अकाऊंटशी लढण्यास मदत होईल, असे कंपनीने म्हटले आहे. पैसे भरल्यानंतर आणि ओळखपत्राची पडताळणी केल्यानंतर, वापरकर्त्याच्या नावासमोर निळ्या रंगाची टिक दिसेल. यामुळे इतरांना अस्सल खाते ओळखणे कठीण होणार नाही. येत्या काळात ते भारतातही लाँच केले जाईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mark zuckerberg launched a plan for 1000 months will you have to pay to run facebook instagram pdb