Mark Zuckerberg हे मेटाचे सीईओ आहेत. मेटा ही फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हाट्सअॅपची मूळ कंपनी आहे. सध्या मार्क झुकरबर्ग यांच्याबद्दल एक वेगळीच बातमी समोर येत आहे. तुम्ही कधी मार्क झुकरबर्ग यांना Louis Vuitton पोषाखामध्ये रॅम्पवर चालताना पाहिले आहे का ? आकर्षक पोषाखामध्ये आत्मविश्वासाने रॅम्पवर चालताना झुकरबर्ग यांचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मेटामधील हजारो कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यानंतर झुकरबर्ग आपले करिअर बदलत आहेत का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र त्याच वेळी हे असे का करत आहे असाही लोकांना प्रश्न पडला आहे. तर नाकी हे काय प्रकरण आहे हे आपण जाणून घेऊयात.
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये मार्क झुकरबर्ग अशा लूकमध्ये दिसत आहेत की त्यांना या आधी असे कधीच पाहण्यात आले नव्हते. यामुळे हे फोटो बनावट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र हे फोटो खरे नसून त्यांना AI च्या मदतीने तयार करण्यात आले आहे. फोटोंमध्ये झुकरबर्ग हे रॅम्पवर चमकदार पिवळ्या रंगाच्या पोशाखात चालताना दिसत आहे. तर एक फोटोमध्ये त्यांनी Louis Vuitton चमकदार गुलाबी पोशाख घातलेला दिसत आहे. AI मधून तयार केलेली ही चित्रे एका दृष्टीक्षेपात अगदी खरी वाटतात. याबाबतचे वृत्त इंडिया टूडेने दिले आहे.
हेही वाचा : खुशखबर! Layoffs च्या काळात ‘ही’ भारतीय कंपनी करणार १ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती
मार्क झुकरबर्ग यांचे हे फोटोज मिडजर्नीच्या मदतीने तयार करण्यात आली आहेत. झुकरबर्ग यांचे AI च्या मदतीने तयार करण्यात आलेले फोटोज लीनस नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने शेअर केले आहे. तो एक AI क्रिएटर आहे.
दरम्यान, कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीचे AI च्या मदतीने तयार केलेलं फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांच्याही काही फोटोनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता.
जेव्हा या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला तेव्हा हे फोटो तयार करण्यासाठी मदत करणाऱ्या AI टूल मिडजर्नीने लोकांना फ्री ट्रायल देणे बंद केले आहे. आता ज्यांच्याकडे पेड सब्स्क्रिप्शन असेल त्यांनाच मिडजर्नी ५ सिरीज वापरून फोटोज तयार करता येणार आहेत.