जगप्रसिद्ध सोशल मीडिया कंपनी फेसबुकचे सह-संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्यामुळे आज आपण घरबसल्या एकमेकांशी जोडलेले आहोत आणि व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया ॲपवर हवा तेवढा संवाद साधून वेळ घालवतो आहोत. तर आता मार्क झुकरबर्ग एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. ते एक गुप्त घर बांधणार आहेत. तसेच या गुप्त घरामध्ये तळघराबरोबर इतर गोष्टीही बांधल्या जात आहेत. काय असणार आहे या खास तळघरामध्ये जाणून घेऊयात…

मार्क झुकरबर्ग हवाई कंपाऊंड (Hawaii compound) म्हणजेच गुप्त घर बांधणार आहेत. यात ५०० स्क्वेअर फूट तळघर असेल. या कंपाऊंडचे नाव ‘कूलौ रांच’ (Koolau Ranch ) ठेवले जाणार आहे, जे काउई बेटावर (Kauai island) बांधले जाईल. तसेच या तळघरामध्ये शिडीद्वारे प्रवेश करण्यायोग्य उंच धातूचे दरवाजेही आहेत. या बंकरमध्ये ३० बेडरूम, ३० स्नानगृहे आणि काही ‘ट्री हाऊस’ असतील. तसेच ग्रंथालयात ब्लाइंड डोअर्स (blind doors) उभारण्याचीसुद्धा तयारी करत आहेत.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
white house
३,००० कामगार, ४१२ दरवाजे, १३२ खोल्या अन् बरंच काही; जाणून घ्या ट्रम्प यांच्या होणाऱ्या अधिकृत निवासस्थानाची वैशिष्ट्यं
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ

हेही वाचा…शिक्षण क्षेत्रातही उतरणार एलॉन मस्क! शाळा अन् कॉलेज उभारण्याची तयारी सुरू…

अजूूनपर्यंत या गुप्त घराचे काम पूर्ण झालेले नाही. तसेच हे आधुनिक इतिहासातील सर्वात महागड्या वैयक्तिक बांधकाम प्रकल्पांपैकी एक असणार आहे. सार्वजनिक रेकॉर्ड विनंत्यांद्वारे प्राप्त स्रोत आणि नियोजन दस्ताऐवजानुसार, या मालमत्तेची किंमत अंदाजे १०० मिलियन डॉलर आहे. त्या व्यतिरिक्त, जमिनीची किंमत १७० मिलियन डॉलर आहे. एकूणच, झुकरबर्ग या मालमत्तेवर २७० मिलियन डॉलर खर्च करणार आहेत.

तसेच हवेलीतील पाणीपुरवठ्याचीही व्यवस्था आतूनच केली जाणार आहे. त्यासाठी पंप बसवण्यात येणार असून पाणी साठवण्यासाठी मोठी टाकीही बांधण्यात येणार आहे. त्यामुळे आधुनिक इतिहासात मार्क झुकरबर्गचे हे घर जगातील सर्वात महागड्या घरांमधील एक घर ठरणार आहे.