जगभरातील संगणकाचे अनेक गोष्टींपासून संरक्षण करणाऱ्या मॅकॅफे (McAfee) कंपनीने कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये ‘प्रोजेक्ट मॉकिंगबर्ड’ या AI-सक्षम डीपफेक ऑडिओ डिटेक्शन तंत्रज्ञानाची घोषणा केली. हे नवीन, मालकीचे तंत्रज्ञान सायबर गुन्हेगारांच्या वाढत्या धोक्यापासून वापरकर्त्यांना संरक्षण मिळावे या दृष्टीने विकसित करण्यात आले आहे; जे लोकांचे पैसे व वैयक्तिक माहिती काढून घेतात आणि ‘सायबर बुलिंग’ करतात.

मॅकॅफे कंपनी त्यांचा एआय नवीन प्रकल्प उभारत आहे. प्रोजेक्ट मॉकिंगबर्डचे पहिले सार्वजनिक डेमो, मॅकॅफेचे डीपफेक ऑडिओ डिटेक्शन तंत्रज्ञान, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो २०२४ मध्ये ऑनसाइट उपलब्ध असेल. या नवीन एआय तंत्रज्ञानाचे अनावरणदेखील मॅकॅफे कंपनीच्या फोकसचा आणखी एक पुरावा आहे. कंपनी एआय AI मॉडेल्सचा पोर्टफोलिओ विकसित करण्यावर भर देत आहे.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Monopole erection to keep power system running smoothly
वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी मोनोपोल
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा

अत्याधुनिक जगात वाढत्या जनरेटिव्ह एआय टूल्समुळे सायबर गुन्हेगारांसाठी घोटाळ्यांशी संबंधित काही मार्ग सोपे झाले आहेत. उदाहरणार्थ- संकटात असणाऱ्या एका कुटुंबातील सदस्यांशी आवाज बदलून व्हॉइस क्लोनिंग करणे किंवा पैसे मागणे. तसेच ‘चिपफेक’ म्हणजे एखाद्याच्या तोंडून निघणारे शब्दांचे किंवा वाक्यांचे एखाद्या बनावट ऑडिओमध्ये त्याचे रूपांतर करणे, टीव्हीवर बातम्या किंवा सेलिब्रिटींच्या मुलाखती यांच्या व्हिडीओंमध्ये फेरफार करणे आदी गोष्टींचा यात समावेश असू शकतो.

हेही वाचा…Ayodhya Ram Mandir: अयोध्येच्या संरक्षणासाठी AI सज्ज! श्रीरामाच्या मंदिर लोकार्पण सोहळ्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह असणार खास सुरक्षा

प्रोजेक्ट मॉकिंगबर्ड कसे काम करील?

मॅनिप्युलेट केलेला कन्टेन्ट पूर्वीसारखा करण्यात ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी मॅकॅफेने प्रगत AI मॉडेल विकसित केले आहे. त्याद्वारे व्हिडीओ, ऑडिओ एआय जनरेटेड आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी AI मॉडेल्सना प्रशिक्षण दिले गेले आहे की, मॅकॅफे प्रोजेक्ट मॉकिंगबर्ड व्हिडीओ किंवा ऑडिओ एआय तंत्रज्ञानाने सक्षम आहे की नाही हे संदर्भ आणि वर्णन करून स्पष्ट करील. तसेच मॅकॅफेने हे प्रोजेक्ट वापरकर्त्यांना संरक्षण क्षमता प्रदान करून चिपफेक किंवा डीपफेकसाठी तयार केलेल्या सामग्रीचा शोध आणि संरक्षण ९० टक्के अचूक करू शकते, असे सांगितले जात आहे.

मॅकॅफेच्या (MacAfee) नवीन AI शोध क्षमतांसह वापरकर्त्यांना एक साधन प्रदान करतील; जे लोकांना त्यांचे डिजिटल जग समजून घेण्यास आणि माहिती देण्यासाठी ९० टक्क्यांपेक्षा जास्त अचूकतेने कार्य करतील. तसेच यात पावसाची ७० टक्के शक्यता दर्शविणारा हवामानाचा अंदाज तुम्हाला तुमच्या दिवसाचे नियोजन करण्यासही मदत करील, असे मॅकॅफेचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी स्टीव्ह ग्रोबमन म्हणाले.

प्रोजेक्ट मॉकिंगबर्ड हे नाव का दिले? (Why Project Mockingbird) :

मॉकिंगबर्ड्स हा पक्ष्यांचा एक समूह आहे; जो प्रामुख्याने इतर पक्ष्यांच्या गाण्याची नक्कल करण्यासाठी किंवा ‘विनोद’ करण्यासाठी ओळखला जातो. मॉकिंगबर्ड्सची थट्टा का करतात याचे कोणतेही खास असे कारण नाही. पण, असे म्हटले जाते की, मादी पक्षी अधिक गाणी गाणाऱ्या नरांना प्राधान्य देतात. म्हणून नर त्यांची फसवणूक करतात. त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगार ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी सेलिब्रिटी, प्रभावशाली आणि अगदी प्रियजनांच्या आवाजाची ‘मस्करी’ करण्यासाठी किंवा क्लोन करण्यासाठी जनरेटिव्ह एआयचा उपयोग करतात. म्हणून या AI सक्षम नवीन तंत्रज्ञानाचे नाव, असे ठेवण्यात आले आहे.

डीपफेक तंत्रज्ञानाबद्दल चिंता :

वापरकर्त्यांना या सायबर घोटाळ्यांच्या अत्याधुनिक स्वरूपाबद्दल अधिकाधिक चिंता वाटत आहे. कारण- त्यांना आता विश्वास नाही की ते जे बघत आहेत किंवा ऐकत आहेत ते खरे आहे की खोटे? पण, आता मॅकॅफेच्या AI सक्षम नवीन तंत्रज्ञान वापरकर्त्यांचे सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण करण्यासाठी मदत करील.

Story img Loader