आता ज्याच्याकडे स्मार्टफोन आहे तो प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे. आपले कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार किंवा कोणी जवळची व्यक्ती जेव्हा तुम्हाला मेसेज करते तेव्हा तुम्ही लगेच त्या व्यक्तीला रिप्लाय देण्याचा विचार करता. आत हीच सवय लोकांसाठी त्रासदायक ठरते आहे. लोकांना, तात्काळ रिप्लाय देऊन केवळ ते अॅक्टिव्ह आहेत हेच दाखवायचं नसतं तर ते समोरच्यांकडूनही हीच अपेक्षा करू लागतात.
व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम यासारखे अनेक अॅप्स लोकांना विनाविलंब एकमेकांशी जोडतात आणि संवाद साधण्यासाठी उत्तम प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात. तथापि, आता लोकं दिवसभर ऑनलाइन राहू लागले आहेत. परंतु ही सवय लोकांसाठी समस्या ठरू लागली आहे.
काही लोक तर असे असतात, जे इंटरनेटवर २४ तास ऑनलाइन असतात. याचाच परिणाम म्हणून हे लोक इतर लोकांकडूनही तात्काळ रिप्लाय मिळण्याची अपेक्षा करतात. जर असे झाले नाही तर या व्यक्ती अस्वस्थ होतात. जर त्यांना लगेच उत्तर मिळाले नाही तर त्यांच्या मनात चुकीचे विचार येऊ लागतात. अनेक वेळा संबंधित व्यक्तीला काही झाले तर नाही ना, असाही त्यांचा समज होतो. कोरोना महामारीपासून लोकांमध्ये ही सवय वाढली आहे. मोकळा वेळ असल्यावर लोक एकमेकांना लगेच रिप्लाय देतात. परंतु त्यातील एक व्यक्ती कामात व्यस्त असेल तर समोरील व्यक्तीच्या मनात उलट सुलट विचार यायला लागतात.
तज्ञांच्या म्हणण्यानुसार, लोकांमध्ये तात्काळ रिप्लाय मिळण्याची वृत्ती वाढू लागली आहे. या गोष्टीमुळे येणाऱ्या काळात आणखी समस्या वाढू शकतात. मेसेजचा रिप्लाय तात्काळ न मिळाल्यामुळे चिढणे किंवा चिंता करणे ही सतत ऑनलाइन राहण्याचे दुष्परिणाम आहेत.
यावर्षी कधी साजरी होणार होळी? जाणून घ्या होलिका दहनाच्या शुभ मुहूर्ताची ‘ही’ गोष्ट
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या सोशल मीडिया लॅबचे डायरेक्टर प्रोफेसर जेन हैन्कॉक यांनी सांगितले की मोबाईलचा वापर करणारे अधिकतर लोकांकडे वेगवेगळे मेसेजिंग अॅप उपलब्ध आहेत. २४ तास ऑनलाइन राहण्याच्या सवयीमुळे ते लगेच रिप्लाय देण्यास सक्षम आहेत. अशातच मोबाईलवरील अॅप्सची वाढती संख्या तात्काळ रिप्लाय मिळण्याची अपेक्षा वाढवत आहे.