कधी कधी आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपवर एखाद्याला त्वरित संदेश पाठवायचा असतो आणि त्यावेळी आपल्याकडे त्या व्यक्तीचा नंबर सेव्ह नसतो. तेव्हा आपल्याला थोडी लांबलचक प्रक्रिया फॉलो करावी लागते आणि प्रथम त्याचा नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह करावा लागतो. जरी तुम्हाला त्या व्यक्तीचा नंबर सेव्ह करायचा नसेल तरीही तुम्हाला त्याला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवण्यासाठी त्याचा नंबर सेव्ह करणे अनिवार्य असते. अशावेळी तुम्हाला मनात नसतानाही त्या व्यक्तीचा नंबर सेव्ह करावा लागतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण अशी एक ट्रिक आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही संबंधित व्यक्तीचा नंबर सेव्ह न करताही त्याला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवू शकता. नंबर सेव्ह न करता मेसेज करण्यासाठी, तुमच्या फोनवर ब्राउझर उघडा. यानंतर http://wa.me/91xxxxxxxxxx ही लिंक तिथे पेस्ट करा. xxxx च्या जागी, आपण ज्या व्यक्तीला संदेश पाठवणार आहात त्याचा नंबर टाका. पण सुरुवातीला देशाचा कोड टाकायला विसरू नका.

कॉल करण्यासाठी आता मोबाईल नेटवर्कची गरज नाही; ‘या’ फीचरमुळे कॉलिंग होणार सोपे

हा नंबर टाकल्यानंतर तुम्ही सर्च केल्यावर तुम्हाला स्क्रीनवर Continue to Chat चा पर्याय दिसेल. तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर एक चॅट बॉक्स उघडेल. ही ट्रिक फॉलो करून आता तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर कोणताही नंबर सेव्ह न करता त्यांना सहज मेसेज करू शकता.

आपल्या युजर्सच्या सुरक्षेसाठी अत्यंत संवेदनशील असल्याचा दावा व्हॉट्सअ‍ॅप करत आहे. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांना एंड-टू-एंड एन्क्रिप्शन देखील देते. या अ‍ॅपवरून पाठवलेले तुमचे मेसेज पूर्णपणे कूटबद्ध केलेले आहेत म्हणजेच मेसेज पाठवणारा आणि प्राप्तकर्त्याशिवाय कोणतीही तिसरी व्यक्ती तुमचे मेसेज वाचू शकत नाही.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Messages can now be sent from whatsapp without saving the number learn simple tricks pvp
Show comments