व्हॉट्सअप हे असे अॅप आहे की, जे तुम्हाला सगळ्याच लोकांच्या फोनमध्ये सहज दिसेल. भारतातच काय तर अगदी जगभरातील लोक हे अॅप वापरतात. व्हॉट्सअपही वापरकर्त्यांच्या सोईसाठी नवनवीन फीचर घेऊन येत असते. आता व्हॉट्सअप युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. मेटा कंपनी व्हॉट्सअपच्या युजर्ससाठी एआयचे (AI) एक खास फीचर घेऊन येत आहे. काय आहे हे फीचर जाणून घेऊ.
मेटा कंपनी एआयचे मॉडेल आता व्हॉट्सॲप युजर्ससाठीही घेऊन येत आहे. मार्क झुकरबर्ग यांनी मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप मेटा कनेक्ट २०२३ (WhatsApp Meta Connect 2023) कार्यक्रमादरम्यान घोषणा केली की, व्हॉट्सॲपवर आम्ही आता ‘एआय चॅटबॉट’ (AI chatbot) हे फीचर घेऊन येत आहोत. चॅटबॉट सुरुवातीला युनायटेड स्टेट्समधील युजर्ससाठी उपलब्ध होते. पण, आता ॲण्ड्रॉइड युजर्ससाठी व्हॉट्सॲप बीटामध्ये लवकरच हे भन्नाट फीचर उपलब्ध करून दिले जाणार आहे.
तुम्हाला ॲण्ड्रॉइड व्हर्जनसाठी व्हॉट्सॲपमध्ये एका वेगळा शॉर्टकट पाहायला मिळेल. युजरला नवीन चॅट सुरू करण्यासाठी एक वेगळा आयकॉन पाहायला मिळणार आहे. एआय चॅटबॉट हे चॅट्स (chat) विभागात तुम्हाला दिसेल. तिथे तुम्हाला नवीन चॅट हा (New Chat) आयकॉन दिसेल. या आयकॉनच्या मदतीने एक नवीन शॉर्टकट तयार होईल आणि एआय चॅटमध्ये प्रवेश करणे सोपे जाईल. त्यामुळे व्हॉट्सॲप युजर्सना या नवीन टूलबाबत सहज माहिती मिळेल आणि अगदी सहजपणे याचा उपयोग करता येईल.
हेही वाचा…‘गूगल फोटोज’वर तुमचे खास जुने फोटो सेव्ह करायचेत? मग फॉलो करा ‘या’ सोप्या ट्रिक्स…
सहलीची प्लॅनिंग, व्हॉट्सॲपसंबंधित प्रश्नाची उत्तरे, विशिष्ट कामाचे वेळापत्रक, ग्रुप चॅट, जोक्स आदी गोष्टींसाठी तुम्ही एआय चॅटबॉटचा वापर करू शकता. तसेच माहितीचा एक स्रोत म्हणून हे फीचर डिझाईन करण्यात आले आहे. नेमकी ही सुविधा कधी सुरू होईल ते कंपनीने अद्याप हे स्पष्ट केलेले नाही. जे लोक व्हॉट्सअपच्या बीटा प्रोग्रॅमचा भाग आहेत, ते सर्व या नव्या फीचरची टेस्टिंग करू शकतील. आतापर्यंत हे फीचर सुरुवातीला व्हॉट्सॲपच्या पब्लिक व्हर्जनमध्ये आलेले नाही,असे सांगण्यात येत आहे.मेटाचे एआय AI सहायक वापरकर्त्यांना इमॅजिन (imagine) कमांडचा वापर करून वास्तववादी दिसणार्या प्रतिमा तयार करण्यास परवानगी देईल. तसेच हे सर्व विनामूल्य उपलब्ध आहे. कंपनीने सांगितले की, त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या बिंग चॅटसह एआय कोलॅबोरेट केले आहे. आता लवकरच व्हॉट्सॲप युजर्ससाठी एआय चॅटबॉट (AI chatbot) हे फीचर घेऊन येत आहे.