पूर्वीच्या काळात अभ्यासाव्यतिरिक्त मैदानी खेळ मनोरंजनासाठी खेळले जायचे. पण, आता शाळकरी विद्यार्थ्यांना मनोरंजनासाठी स्मार्टफोनचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र, हे स्मार्टफोन्स लहान मुलांसाठी धोका ठरत आहेत. लहान वयातच ही मुले स्मार्टफोनद्वारे सोशल मीडियाशी हळूहळू कनेक्ट होऊ लागले आहेत आणि याचा मुलांच्या आरोग्यावर शारीरिक आणि मानसिक स्तरावर परिणाम होताना दिसून येत आहे; तर आता या गोष्टी लक्षात घेऊन मेटा कंपनीने एक खास निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेटा कंपनी किशोरवयीन मुलांना हानिकारक कन्टेन्टपासून दूर ठेवण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलत आहे. मेटा कंपनीवर फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे प्लॅटफॉर्म आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा आरोप ३३ टक्के युजर्सनी केला आहे ; त्यामुळे कंपनीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. युजर्सचे वय लक्षात घेता मेटा कंपनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून स्पेसिफिक कन्टेन्ट प्लॅटफॉर्मवरून युजर्ससाठी काढून टाकणार आहे.

हेही वाचा…Atal Setu: मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमध्ये सात तंत्रज्ञानाचा वापर! इको-फ्रेंडली लाइटिंग अन् टोल भरण्यासाठी असणार खास पर्याय…

किशोरवयीन मुलांसाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या नवीन पॉलिसी आपोआप सेटिंगमध्ये डीफॉल्ट करतील आणि मुलांना आत्महत्या, स्वतःला नुकसान पोहचवणे आदी अनेक विषयांवर रील किंवा व्हिडीओ दाखवण्यास आणि शोधण्यास प्रतिबंधित करतील. मेटाने सांगितले की, जे युजर्स अश्या प्रकारचे कन्टेन्ट पोस्ट करतील, त्यांना पोस्ट करण्यापूर्वी तज्ज्ञ संसाधनांकडून मदत घेण्याचा सल्ला दिला जाईल.

किशोरवयीन मुलांसाठी टेक जायंट सोशल मीडिया नेटवर्क्स फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर त्यांची सुरक्षा आणि गोपनीयता वाढवण्यासाठी नोटिफिकेशन पाठवेल. तेव्हा किशोरवयीन मुलांनी ‘टर्न ऑन रिकमेन्डेड सेटिंग’ हा पर्याय ऑन करायचा. हा पर्याय निवडल्यानंतर मेटा या युजर्ससाठी निर्बंध लागू करेल आणि हानिकारक कन्टेन्ट पोस्ट, टॅग करण्यापासून किंवा रील रीमिक्समध्ये त्या प्रोफाइलचा समावेश करण्यापासून प्रतिबंधित करेल. पुढील आठवड्यात हे बदल फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर युजर्सना दिसून येतील, असे कंपनीने सांगितले आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meta company soon hide harmful content from teenagers on instagram and facebook app asp
Show comments