एखादा फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्यापूर्वी आपण सगळ्यात आधी तो थोडा एडिट करतो. कारण- अनेकदा फोटो काढताना बॅकग्राऊंडमध्ये एखादी व्यक्ती, वस्तू फोटोत दिसते आणि ती रिमूव्ह करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी आपण अनेक एडिटिंग ॲप्सचा उपयोग करतो. पण, आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण- त्यासाठी मेटा एआय (Meta AI) तुम्हाला मदत करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वीच मेटाने त्यांच्या मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपवर मेटा एआय (Meta AI) हे नवीन फीचर आणले आहे; ज्याला तुम्ही चॅट जीपीटीप्रमाणे सगळे काही काही विचारू शकता. एखाद्या विषयाची माहिती असो किंवा एखादा पिकनिकचा प्लॅन करायचा असो; मेटा एआय तुम्हाला संदर्भासह स्पष्टीकरण चुटकीसरशी देणार आहे. मेटा कंपनीने व्हॉट्सॲपवर नवीन एआय capability चाचणी सुरू केली आहे. त्यामुळे आता मेटा एआयच्या मदतीने तुम्हाला फोटो सहज एडिट करता येणार आहेत.

हेही वाचा…Ola ने गूगल मॅप्सला केलं ‘गुड बाय’! का घेण्यात आला हा निर्णय ? मग कोणत्या ॲपचा होणार उपयोग? जाणून घ्या सविस्तर…

व्हॉट्सॲपवर बीटा आवृत्ती 2.24.14.20 वर वापरकर्त्यांसाठी मेटा एआयच्या वतीने दोन नवीन Capabilities ऑफर्स दिल्या जात आहेत. फोटो अपलोड करणे व त्याबद्दल प्रश्न विचारणे. तसेच टेक्स्ट प्रॉम्प्ट वापरून, ते फोटो AI द्वारे एडिट करून घेणे अशा दोन ऑफर्स आहेत. त्यासाठी तुम्हाला तळाशी उजव्या कोपऱ्यातील कॅमेरा बटण वापरून तुमचे फोटो तुम्हाला अपलोड करावे लागतील किंवा एखादा फोटो कॅप्चर करून, तुम्ही तो एडिट करून घेऊ शकता. मेटा असेही म्हणते की, अपलोड केलेल्या फोटोच्या चेहऱ्यावरील फीचर्स AI द्वारे विश्लेषित केल्या जातील. तसेच वापरकर्ते हे फोटो कधीही डिलीटसुद्धा करू शकतात.

पण, मेटा एआय व्हॉट्सॲपवर कशा प्रकारे इमेज एडिटिंग करून देऊ शकते याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. इतर AI वर चालणाऱ्या इमेज एडिटिंग टूल्सचा विचार करता, Meta AI फोटोतील एखादी वस्तू काढून टाकण्यास, बॅकग्राऊंड काढून तुमच्या फोटोचे स्वरूप बदलून देऊ शकते. व्हॉट्सॲपवरील मेटा एआय कंपनीच्या नवीन व सर्वांत सक्षम लार्ज लँग्वेज जनरेटिव्ह AI मॉडेल Llama 3 वर आधारित आहे; जे मल्टीमोडॅलिटीला सपोर्ट करते. तसेच हे एआय टेक्स्ट, आवाज, फोटो, मजकूर, आवाज समजून घेऊन त्याला टेक्स्ट, आवाज व फोटोसह रिस्पॉन्स किंवा रिप्लायसुद्धा देऊ शकते. व्हॉट्सॲपव्यतिरिक्त मेटाने फेसबुक, इन्स्टाग्राम, मेसेंजर यांसारख्या इतर लोकप्रिय प्लॅटफॉर्मवरही AI देखील सादर केले आहे. या प्लॅटफॉर्मवर युजर्स क्विक रिस्पॉन्स (प्रतिसाद) मिळविण्यासाठी किंवा विनामूल्य फोटो बनविण्यासाठी चॅटबॉटमध्ये प्रवेश करू शकतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meta company started testing a new ai capability on whatsapp which enables users to analyse and edit an image instantly asp
Show comments