मेटा म्हणजे पूर्वीचे फेसबुक असलेल्या कंपनीने रे-बॅन आय-वेअर कंपनीसोबत भागीदारी करून स्मार्ट ग्लासेस लाँच केल्या आहेत. हे रे-बॅन (Ray-Ban) चष्मे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) फीचरसह प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. कंपनीने जाहीर केले आहे की, युजर्सना या चष्म्यांमध्ये सर्वांत हटके एआय (AI) फंक्शन्स वापरून पाहण्याची परवानगी मिळणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘रे बॅन’ चष्म्यामध्ये काय आहे खास?
‘रे बॅन’ चष्म्यामध्ये कॅमेरा आणि मायक्रोफोन इनबिल्ड आहेत. तसेच यामध्ये एआय फीचरसुद्धा आहे. तसेच हे फीचर तुमच्या सभोवताली असणाऱ्या गोष्टी बघू किंवा ऐकू शकणार आहेत. तसेच लँडमार्कची माहिती, तुमच्या मजकुराचे भाषांतर, तुमच्यासाठी मॅचिंग कपडे तसेच स्क्रीनवर दिसणाऱ्या फोटोंच्या कॅप्शन आदी सगळ्या गोष्टींसाठी हा ‘रे बॅन’ चष्मा अगदीच उपयुक्त ठरणार आहे.
हा चष्मा आत असलेला एआय (AI) सहायक कॅमेरा आणि मायक्रोफोनद्वारे आजूबाजूच्या परिस्थितीचे विश्लेषण करू शकतो आणि नंतर एआयच्या मदतीने माहिती युजर्सना प्रदान करू शकतो. उदाहरणार्थ ; समजा तुम्ही हा चष्मा घातला आहात आणि तुम्ही फिरायला गेलेल्या लँडमार्कबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचे आहे. ‘रे बॅन’ चष्मा एआय (AI) कॅमेर्याद्वारे लँडमार्क ओळखू शकतो आणि तुम्हाला त्या लँडमार्कची माहिती देऊ शकतो. त्याचप्रमाणे चष्मा घातल्यावर तुम्ही एआयला प्रश्न विचारल्यास किंवा तुम्हाला मदतीची आवश्यकता असल्यास एआय AI सहायक मायक्रोफोनद्वारे तुमची व्हॉइस कमांड समजून घेऊ शकतो आणि संबंधित माहिती तुम्हाला प्रदान करू शकतो.
हेही वाचा…शाळकरी मुलांसाठी भारतातील पहिला अन् सर्वात सुरक्षित टॅब लाँच! फिचर्स पाहून तुम्हीही पडाल प्रेमात…
या चष्म्यामध्ये विशेष एआयची (AI) क्षमता आहे; ज्यात कॅमेरा आणि मायक्रोफोनची सुविधा आहे. युजरने चष्मा घातल्यावर एआयच्या मदतीने हा रे-बॅन आजूबाजूच्या गोष्टी “पाहू” आणि “ऐकू” शकतो. हा रे-बॅन चष्मा युजर्सना एआय (AI) फीचरचा अनुभव घेण्यास आणि एक्सप्लोर करण्यास अनुमती देईल; ज्यामुळे आपण आपल्या दैनंदिन जीवनात तंत्रज्ञानाशी कसा संवाद साधू शकतो याचासुद्धा अनुभव वापरकर्त्यांना घेता येईल.
मार्क झुकरबर्गने यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत रे बँडचा एआयच्या नवीन फीचरसह कसा वापर केला जातो हे त्यांनी दाखवले आहे. मार्क झुकरबर्ग यांनी कपाटातील त्यांचा एक शर्ट धरला आणि रे बॅनला चांगली पॅन्ट सुचवायला सांगितली. चष्म्याने शर्टचे वर्णन केले आणि शर्टला जुळणारे काही पॅन्टचे पर्याय सुचवले. त्याव्यतिरिक्त त्यांनी भाषांतरीत करण्यासाठी मजकूर, तसेच काही फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत. त्यात श्वानासाठी मजेशीर कॅप्शन आणि एका फळाचे नाव ओळखण्यास सांगितले आहे. रे-बॅनने या सर्वांची एआयच्या मदतीने अगदीच अचूक उत्तरे दिली.
व्हिडीओ नक्की बघा :
तसेच रे-बॅनचा उपयोग करण्यासाठी साइन अप कसे कराल?
१. सगळ्यात आधी मेटा व्ह्यु ॲप (Meta View) उघडा.
२. त्यानंतर उजवीकडे असणाऱ्या एका आयकॉनवर क्लिक करा.
३. त्यानंतर सगळ्यात खाली अर्ली ॲक्सेस (Early Access) असा एक पर्याय दिसेल.
४. नंतर जॉइन अर्ली ॲक्सेसवर (Join Early Access ) टॅप करा