सध्या जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत अनेक टेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. त्यामध्ये फेसबुकची मूळ कंपनी असणाऱ्या Meta ने देखील कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. या कंपनीबाबत अजून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. मेटाचे भारतातील ब्रॅन्चचे पार्टनरशिप हेड मनीष चोप्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
मनीष चोप्रा हे साडेचार वर्षांपासून मेटा कंपनीचे भारतातील पार्टनरशिप हेड म्हणून काम पाहत होते. मनीष चोप्रा यांच्या रूपाने मेटा कंपनीतील हा एका वर्षातील चौथा राजीनामा आहे. याआधी २०२२ नोव्हेंबरमध्ये मेटा इंडियाचे प्रमुख अजित मोहन आणि पब्लिक पॉलिसी हेड राजीव अग्रवाल यांनी देखील राजीनामा दिला होता. त्याच वेळी व्हॉट्सअॅप इंडियाचे प्रमुख अभिजित बोस यांनीही राजीनामा दिला होता. अजित मोहन यांनी मेटा सोडल्यानंतर Snap inc जॉईन केली. राजीव अग्रवाल यांनी सॅमसंगमध्ये काम सुरु केलेतर अभिजित बोस यांनी एका नवीन स्टार्टअपवर काम करणार असल्याचे सांगितले होते. याबाबतचे वृत्त मनीकंट्रोलने दिले आहे.
मेटा इंडियाच्या संध्या देवनाथन यांनी एका निवेदनात म्हटले, ”मनीष यांनी आपल्या व्यावसायिक प्रवासात एक नवीन टप्पा गाठण्यासाठी मेटामधील आपल्या भूमिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ते ४ वर्षांपेक्षा जास्त काळ भारतीय लिडिंग टीमचा हिस्सा होते. त्यांनी आमचा व्यवसाय वाढवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.” तसेच त्या पुढे म्हणाल्या, ”मनीष चोप्रा यांनी त्यांच्या भूमिकेतून आमच्या कंपनीच्या असणाऱ्या प्राथमिकता सक्षम करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. आम्ही त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञ आहोत आणि पुढील भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो.”
मनीष चोप्रा हे २०१९ मध्ये मेटा इंडिया (फेसबुक इंडियाच्या तुलनेत) मध्ये तवणूक आणि पार्टनरशिप हेड म्हणून सामील झाले. मेटा कंपनीची वाढ व विकास करण्यासाठी मनीष चोप्रा यांना ही जबाबदारी देण्यात आली होती. ज्यामध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपचा समावेश आहे. मनीष चोप्रा हे मीडिया, कंटेंट, क्रिएटर, पेमेंट्स आणि त्याचे व्यावसायिक कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म वर्कस्पेस यांसारख्या क्षेत्रातही ते नेतृत्व करत होते.