अलिकडे तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी नोकर कपात सुरू केली आहे. मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर कंपनीतील जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली. त्यानंतर मस्कच्या पावलावर पाऊल ठेवत फेसबुकची कंपनी मेटाने देखील ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. काल सकाळी नोकर कपातीला सुरुवात झाली.
एका ब्लॉगपोस्टमध्ये मेटाचे सीईओ यांनी या निर्णयाविषयी स्पष्टीकरण दिले आहे. मेटाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा बदल असल्याचे झकरबर्ग यांनी लिहिले आहे. तसेच त्यांनी कर्मचाऱ्यांना का काढले, याची कारणे देखील सांगितली आहेत. नोकरकपात होण्यामागील ८ महत्वाची कारणे पुढील प्रमाणे आहेत.
(REAL ME 10 झाला लाँच; ५० एमपी कॅमेरा, 33 वॉट चार्जिंगसह मिळतंय बरंच काही, जाणून घ्या किंमत)
१) ई कॉमर्समध्ये वाढलेली गुंतवणूक
महामारीच्या सुरुवातीला जग मोठ्या प्रमाणात ऑनलाईन आले. ई कॉमर्सच्या वाढीमुळे मोठ्या प्रमाणात महसूल वाढला. मेटा आणि मला असे वाटले की हे कायम राहील. मी गुतवणूक वाढवण्याचा निर्णय घेतला, मात्र दुर्दैवाने अपेक्षित होते तसे झाले नाही आणि कंपनीचा महसूल बुडाला, असे झकर्बग यांनी स्पष्ट केले आहे.
२) अर्थव्यवस्थेत मंदी
माक्रोइकोनॉमिक मंदीमुळे महसूल अपेक्षेपेक्षा अधिक घटला. मेटाच्या त्रैमासिक निकालांचे चित्र ठिक नव्हते आणि पुढील तिमाहीचा अंदाजही खूप आशावादी नव्हता, असे झकरबर्ग यांनी नमूद केले.
(शेअरचॅटमध्ये होणार नोकरकपात; ४०० कर्मचाऱ्यांना गमवावी लागणार नोकरी)
३) वाढलेली स्पर्धा
वाढलेली स्पर्धा आणि अॅड सिग्नल लॉस हे महसुलात घट झाल्याचे अजून एक कारण असल्याचे झकरबर्ग यांनी सांगितले. अॅड सिग्नल लॉसचा उल्लेख करण्यात आला. याचा अर्थ अॅपचा मागोवा घेण्याच्या अॅपलच्या पारदर्शकतेमुळे ( Apple App Tracking Transparency ) मेटाला चांगलाच फटका बसला आहे. कंपनीने यापूर्वी सांगितले होते की, जेव्हापासून अॅपला अॅप ट्रॅकिंग ट्रान्सपरेन्सी मिळाली आहे तेव्हापासून कंपनीला १० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. ट्रॅकिंग फीचर अॅप्सना युजरचा मागोवा घेऊ देत नाही. यामुळे युजरबाबत माहिती मिळत नाही. तसेच, झकर्बग यांनी स्पर्धेचा उल्लेख केला आहे, याचा संबंध गेल्या काही वर्षांपासून टिकटॉकच्या वाढत्या प्रभावाशी असू शकतो.
४) वाढलेला खर्च
गेल्या त्रैमासिक निकालांमध्ये खर्च वर्ष दर वर्ष १९ टक्क्यांनी वाढत असल्याचा खुलासा मेटाने केला होता. तिसऱ्या तिमाहीत मेटाचा खर्च २२.१ अब्ज डॉलर्स होता. खर्च कपातीमुळे कर्मचाऱ्यांची नोकरी गेली.
(बड्या ‘टेक’ कंपन्या इतकी घाऊक कर्मचारी कपात करतात, हे लक्षण कशाचं?)
५) विक्री आणि उत्पन्नात घट
तिसऱ्या तिमाही दरम्यान, एकूण विक्री ४ टक्के कमी झाली आणि मिळकत ४६ टक्क्यांनी कमी होत ५.६६ अब्ज डॉलर्सवर आल्याचा खुलासा मेटाने केला होता.
६) योग्यरित्या भांडवल करण्याची गरज (कॅपिटल एफिसिएंट)
मेटाने अधिक कॅपिटल एफिसिएंट होण्याचा निर्णय घेतल्याचे झकरबर्ग यांनी आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास कंपनीची अधिक संसाधने उच्च प्राधान्य असलेल्या वाढ क्षेत्रांमध्ये खर्च होतील. कंपनीने रिअल इस्टेटमधील आपली उपस्थिती कमी केली आहे. भत्ते कमी केले होते, मात्र ते पुरेसे नव्हते.
हे उपाय आपल्या खर्चांना महसूल वाढीच्या बरोबरीत आणण्यासाठी पुरेसे नाहीत, म्हणून मी लोकांना नोकरीवरून काढण्याचा कठोर निर्णय घेतला आहे, असे झकरबर्ग म्हणाले.
(१४९९ रुपयांमध्ये घेऊन या ‘हे’ हेडफोन्स, ५० तासांपर्यंतचा मिळतोय प्लेटाईम)
७) रिअॅलिटी लॅबला नुकसान होण्याची शक्यता
झुकरबर्ग मेटावर्सबाबत आशावादी आहेत. यासाठी जबाबदार असलेली रिअॅलिटी लॅब मोठ्या प्रमाणात पैसा गमवत आहे. रिअॅलिटी लॅबच्या तोट्यात लक्षणीय वाढ होईल, असा आपला अंदाज असल्याचे झकरबर्ग यांनी गेल्या महिन्यात म्हटले होते.
८) मेटाव्हर्सचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान
२०२२ मध्ये रिअॅलिटी लॅबला ९.४ अब्ज डॉलर्सचे नुसान झाल्याचे समोर आले होते, तरी देखील झकरबर्ग आणि कंपनीकडे त्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना आहेत.