अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून फेसबुक आणि इन्स्टाग्रामची कंपनी मेटाने या दोन्ही सोशल माध्यमांवर काही विशेष फीचर सादर केले आहेत. फेसबुक आणि इन्स्टाग्राम खाते असणाऱ्या मुलांसाठी लवकरच डिफॉल्ट प्रायव्हसी सेटिंग्स बदलले जाईल, अशी घोषणा मेटाने अलीकडेच आपल्या ब्लॉगपोस्टवरून केली आहे. तर गेल्या वर्षी मेटाने प्रोढांना मैत्री नसलेल्या तरुणांना मेसेज पाठवण्यापासून प्रतिबंधित करण्यास सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इतकेच नव्हे तर, १८ वर्षांखालील अल्पवयीन तरुणांचे इन्स्टाग्राम खाते संशयास्पद प्रोढाने पाहिल्यानंतर त्या तरुणाच्या इन्स्टाग्राम खात्यावरील मेसेज बटन हटवण्याच्या पर्यायावर मेटा काम करत आहे. जेव्हा एखादी अल्पवयीन युजर एका प्रोढ व्यक्तीची तक्रार करतो किंवा त्यास ब्लॉक करतो तेव्हा त्या खात्याला ‘संशयास्पद’ असे टॅग केले जाते.

(थंडीत मोबाईलचीही बिघडते प्रकृती; उद्भवतात ‘या’ समस्या, नुकसान टाळण्यासाठी हे करा)

या सुरक्षा फीचरबरोबरच मटाने आणखी एक सुरक्षा फीचरबाबत माहिती दिली आहे. १६ वर्षांखालील मुलांनी फेसबुक किंवा इन्स्टाग्राम खाते उघडल्यानंतर त्यांना आपोआप अधिक प्रायव्हेट सेटिंग्स मिळतील, असे मेटाने म्हटले आहे. काही सेटिंग्सच्या माध्यमातून गोपनीयता वाढवण्याबाबत मेटा मुलांना प्रोत्साहीत करेल. या सेटिंग्सद्वारे फ्रेंडलिस्ट, पिपल, पेजेस आणि ज्या पोस्टला टॅग केले आहे त्या पोस्टचे व्ह्युवर्स कोणाला पाहता येईल, हे मुलांना ठरवता येते. त्याचबरोबर, ज्या पोस्टला टॅग करण्यात आले आहे ती पोस्ट प्रोफाईलवर प्रसिद्ध होण्यापूर्वी युजरला रिव्हू करता येईल.

१६ आणि १८ वर्षांखालील असे फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर ज्यांच्या प्रोफाइलची प्रायव्हसी सेटिंग्स कमकुवत असेल त्यांना अ‍ॅपकडून प्रायव्हसी अपडेट करण्याबाबत आणि ‘सजेस्टेड’ सेटिंग्सचा समावेश करण्यासाठी नोटिफिकेशन येईल.

(भन्नाट दिसतो VIVO X 90, लाँच पूर्वी टीझर जारी, जाणून घ्या फीचर्स)

प्रौढांसाठी असलेल्या व्यक्तिगत (इन्टिमेट) छायाचित्रांना गैर सहमतीने शेअर करण्यावर प्रतिबंध घालणाऱ्या धोरणानुसार, कंपनी युजरला असे छायाचित्र शेअर करण्याचे टाळण्यासाठी आणि प्लाटफॉर्मवरून हटवण्यासाठी या छायाचित्रांबाबत तक्रार करण्यासाठी प्रोत्साहित करेल.