आजकाल प्रत्येक जण सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्यातील इन्स्टाग्राम ॲपला तरुणांची पहिली पसंती आहे. तरुणांमध्ये रील्स आणि स्टोरीजची वेगळीच क्रेझ आहे, तर इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करण्यापूर्वी वेगवेगळ्या ॲपची मदत घेऊन या फोटोला एडिट केलं जात. पण, कधी कधी या ॲपवर शुल्क आकारले जातात; तर आता इन्स्टाग्रामने तुमच्यासाठी असे एक फिचर आणले आहे, जे तुमचे फोटो एडिट करण्यास मदत करेल. कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित बॅकग्राउंड फिचर जारी केला आहे.

इन्स्टाग्रामवर नवीन ‘बॅकग्राउंड चेंज AI फिचर’ कसे वापरायचे, याच्या स्टेप्स पुढीलप्रमाणे आहेत :

'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Husband picking up wife and play game see waht happend next funny video goes viral
“भावा बायकोला उचलून घ्यायचं म्हंजी खायचं काम नाय” ‘ही’ स्पर्धा पाहून पोट धरुन हसाल; VIDEO मध्ये पाहा शेवटी कोण जिंकलं
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय

एक सेल्फी काढा किंवा तुमच्या फोनमधील कॅमेरा रोलमधून एक फोटो निवडा. तुमच्या इन्स्टाग्राम स्क्रीनवरील स्टोरी आयकॉनवर क्लिक करा.

एकदा तुमचा फोटो एडिटिंग स्क्रीनवर आला की, वरच्या उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या तीन ठिपक्यांवर टॅप करा आणि मेनूमधून ‘बॅकड्रॉप’ निवडा.

नंतर इन्स्टाग्राम तुमच्या फोटोमधील बॅकग्राउंड आणि माणसं आदी विविध Elements चे विश्लेषण करेल. या प्रक्रियेसाठी थोडा वेळ जाईल.

तुम्ही तुमच्या फोटोमधील विविध क्षेत्रे निवडू शकता. नवीन बॅकड्रॉप तयार करताना तुमच्याद्वारे न निवडलेली क्षेत्रे एआयद्वारे बदलली जातील.

हे सगळे बदल झाल्यानंतर नेक्स्टवर (Next) टॅप करा.

बॅकड्रॉपसाठी इंग्रजीमध्ये एक सूचना द्या. हे AI ला नवीन बॅकड्रॉप तयार करण्यात मार्गदर्शन करेल.

त्यानंतर तुम्हाला एक मजकूर बॉक्स दिसेल. तिथे “तुम्हाला हव्या असलेल्या बॅकड्रॉपचे वर्णन करा” असे विचारले जाईल. प्राण्यांपासून ते फुलांपर्यंत तुम्हाला आवडेल ते वर्णन त्या बॉक्समध्ये नमूद करा.

त्यानंतर नेक्स्टवर (Next) टॅप करा.

तुमच्या Prompt वर आधारित दोन बॅकड्रॉप पर्याय तयार केले जातील.

दिलेले पर्याय तुम्हाला पसंत नसतील तर त्याच Prompt चा वापर करून दुसरे बॅकड्रॉप निर्माण करण्यासाठी रिफ्रेश चिन्हावर टॅप करा.

Prompt बदलण्यासाठी तळाशी टॅप करा.

तुम्हाला आवडणारा पर्याय निवडा आणि नेक्स्टवर टॅप करा.

तुमचा तयार झालेला फोटो शेअर कारण्यासाठी युअर स्टोरीवर क्लिक करा.

तुम्ही वापरलेला Prompt तुमच्या कथेमध्ये स्टिकर म्हणून जोडला जाईल. तुम्ही ड्रॅग करून डिलीट करू शकता. अशाप्रकारे फोटोचे बॅकग्राउंड तुमच्या आवडीप्रमाणे एडिट होईल.

एआय फिचर वापरताना पुढील काही गोष्टी लक्षात ठेवा :

एआय जनरेटेड केलेल्या फोटोंचा संभाव्य गैरवापर टाळा, असे वेळोवेळी स्पष्टपणे चिन्हांकित केले जाईल.

तुमच्या मजकूर Prompt मधील वैयक्तिक माहितीची काळजी घ्या आणि लक्षात ठेवा की, एआय जनरेटेड केलेल्या प्रतिमा नेहमी अचूक किंवा योग्य नसतात.

फोटोचे बॅकग्राउंड, फोटोशॉपसारख्या लोकप्रिय फोटो संपादन सॉफ्टवेअरप्रमाणेच चेकर्ड पॅटर्न (Checkered Pattern) प्रदर्शित करेल.