Meta ही एक दिग्गज कंपनी आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपची मेटा ही मूळ कंपनी आहे. सध्याचा काळ हा AI चा आहे. अनेक ठिकाणी याचा वापर केला जात आहे. यातच आता मेटाने देखील ऑडिओक्राफ्ट नावाचे एक नवीन ओपन सोर्स AI टूल लॉन्च केले आहे. हे टूल व्यावसायिक संगीतकार आणि दैनंदिन वापरकर्ते या दोघांनाही सोप्या टेक्स्ट प्रॉम्प्टमधून ऑडिओ आणि गाणे तयार करण्यास सक्षम करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

AudioCraft हे टूल MusicGen, AudioGen, आणि EnCodec या तीन मॉडेलपासून बनलेले आहे. म्युझिकजेनला मेटाची स्वतःची म्युझिक लायब्ररी वापरून प्रशिक्षित केले जाते आणि हा टेक्स्ट इनपुटमधून गाणं तयार करू शकतो. दुसरीकडे ऑडिओजेन हे सार्वजनिक धनी प्रभावामध्ये प्रशिक्षित केलेगेले आहेआणि हे टेक्स्ट इनपुटवर ऑडिओ तयार करू शकतो. याशिवाय एनकोडेक डीकोडर सुधारित करण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

हेही वाचा : अबब! Samsung चा ‘हा’ स्मार्ट टीव्ही आहे कारपेक्षाही महाग; किंमत वाचून डोक्याला लावाल हात, फीचर्स पाहाच

नवीन ऑडिओक्राफ्ट टूल कसे वापरावे ?

मेटा आपले पूर्व प्रशिक्षित ऑडिओजेन मॉडेल उपलब्ध करून देत आहे. जे वापरकर्त्यांना कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज , गाड्यांचा हॉर्न यासारखे ध्वनी तयार करून देते. याशिवाय मेटा ऑडिओक्राफ्ट टूलसाठी सर्व मॉडेलचे वजन आणि कोड सादर करत शेअर करत आहे. या नवीन टूलमध्ये संगीत रचना, ध्वनी प्रभाव निर्मिती, कॉम्प्रेशन अल्गोरिदम आणि ऑडिओ जनरेशन यासह अनेक प्रयोग आहेत.

मेटाचा दावा आहे की, जनरेटिव्ह AI ने फोटो, व्हिडीओ आणि टेक्स्टमध्ये महत्वाची प्रगती केली आहे. मात्र ऑडिओमध्ये समान पातळीचा विकास पाहिला नाही. ऑडिओक्राफ्ट उच्च-गुणवत्तेचा ऑडिओ प्रदान करून हे अंतर पूर्ण करते. ऑडिओक्राफ्ट दीर्घ कालावधीसाठी उच्च-गुणवत्तेचा ऑडिओ तयार करण्यासाठी सक्षम आहे. ऑडिओसाठी जनरेटिव्ह मॉडेल्सचे डिझाइन सुलभ बनवते असा कंपनीचा दावा आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना उपलब्ध मॉडेलसह प्रयोग करणे सोपे होते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meta launch ai audiocraft audiogen encodec generation tool generate music from text inputs tmb 01
Show comments