Meta ही एक अमेरिकन कंपनी आहे. इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी आहे. याचे सीईओ मार्क झुकरबर्ग आहेत. मेटाने बुधवारी भारतामध्ये एक नवीन मिक्स रिअॅलिटी (MR) प्रोग्रॅम जाहीर केला आहे. ज्यामध्ये भारतीय स्टार्टअप्स आणि डेव्हलपर्ससाठी Apps तयार करण्यासाठी २५०,००० डॉलर्सच्या फंडाचा समावेश आहे. हा फंड नावीन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी आणि विस्तारित रिअॅलिटी (XR) टेक्नॉलॉजीची इकोसिस्टिम तयार करण्याचा प्रयत्न करेल असे कंपनीने एका निवेदनामध्ये म्हटले आहे.
मिक्स रिअॅलिटी (MR) ज्याला हायब्रीड वास्तविकता किंवा विस्तारित वास्तविकता असे म्हटले जाते. ज्यामध्ये भौतिक वास्तव आणि डिजिटल कंटेंट अशा प्रकारे एकत्रित केले जाते की जे वास्तविक जगामध्ये आणि आभासी गोष्टींमध्ये संवाद करण्यास सक्षम असते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा फंड डेव्हलपर्सना मेटा प्रेझेन्स प्लॅटफॉर्म व AI च्या क्षमतांचा वापर करून Apps तयार करण्यात मदत करेल. याबाबतचे वृत्त livemint ने दिले आहे.
मेटाच्या मिक्स रिअॅलिटी (MR) प्रोग्रॅमचा एक भाग म्हणून पाच भारतीय डेव्हलपर्स आणि स्टार्टअप्सच्या निवडक ग्रुपला मेटा रिअॅलिटीच्या लॅबमधील तज्ञांकडून योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक अनुदान देखील मिळणार आहे. मेटाने आपल्या निवेदनामध्ये म्हटले , त्यांना त्यांचे प्रॉडक्ट क्वेस्ट अॅप लॅबमध्ये अपलोड करण्याची आणि मेटाच्या वाढत्या डेव्हलपर इकोसिस्टिमचा भाग बनण्याची संधी मिळेल.
”मेटा भारतात XR इकोसिस्टिम तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे. प्रेझेन्स प्लॅटफॉर्म हा मेटॅव्हर्स व्हिजनचा एक अविभाज्य भाग आहे, ज्याचे लक्ष्य आभासी अनुभवांना अधिक सुलभ बनवणे आहे.” असे मेटा इंडियाच्या उपाध्यक्ष संध्या देवनाथन यांनी सांगितले. संध्या देवनाथन पुढे म्हणाल्या, ” आम्हाला विश्वास आहे की हा फंड आणि हा प्रोग्रॅम देशामध्ये MR आणि MR अनुभवांची निर्मिती आणि ती निर्मिती स्वीकारण्यास गती देईल. भारतीय डेव्हलपर्सना त्यांच्या नवीन कल्पनांसह जागतिक स्तरावर जाण्याची संधी देईल.”
हेही वाचा : ChatGPT आता तुमच्या प्रश्नांची उत्तरं हिंदीत देणार; कसे ते जाणून घ्या
हा फंड आता अर्जदारांसाठी खुला आहे. जे प्रस्थापित आणि नवीन स्टार्टअप डेव्हलपर्स या दोघांनीही प्रेझेन्स प्लॅटफॉर्मद्वारे ऑर केलेल्या कौशल्यांसह प्रयोग करण्यासाठी आमंत्रित करतो. या प्रोग्राममध्ये निवडण्यात आलेल्या डेव्हलपर्सना पासथ्रू (Passthrough), सिन अंडरस्टँडिंग , व्हॉइस SDK, टेक्स्ट टू स्पीच, हँड ट्रॅकिंग आणि सोशल प्रेझेन्स API साठी इंटरऍक्शन SDK सारख्या फीचर्सच्या मदतीने नवीन मेटा क्वेस्ट Apps मध्ये इंटिग्रेट करण्याची आवश्यकता आहे.