Meta ही फेसबुकची पॅरेंट कंपनी आहे. हीच Meta कंपनी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरशी स्पर्धा करण्यासाठी एका नवीन प्लॅटफॉर्मवर काम करत आहे. मेटा टेक्स्ट आधारित अपडेट कंटेट शेअर करण्यासाठी किंवा पोस्ट करण्यासाठी एका App वर काम करत आहे. हे अॅप ActivityPub वर आधारित असणार आहे जे सोशल नेटवर्किंग प्रोटोकॉल आहे. याचा वापर मास्टोडॉनद्वारे देखील केला जातो. जे ट्विटरचे प्रतिस्पर्धी आहे.
मेटा ज्या अॅपवर काम करत आहे त्या अॅपला P92 हे कोडनेम देण्यात आले आहे. रिपोर्टनुसार हे येत्या काळामध्ये अॅपचे ब्रॅडिंग इंस्टाग्रामच्या अंतर्गत केले जाणार आहे. म्हणजेच इंस्टाग्राम वापरकर्ते त्यांचे युजरनेम आणि पासवर्ड रजिस्टर करून या अॅपचा वापर करू शकणार आहेत.
हेही वाचा : Russia-Ukraine युद्धविरामासाठी ChatGpt ने सांगितले विविध उपाय! शशी थरूर म्हणतात, “वेगवगेळी विचारसरणी …”
मेटाने हे मेनी केले आहे की ते सोशल नेटवर्किंग प्रोटोकॉलवर काम करत आहे. मेटाच्या प्रवक्त्यांच्या माहितीनुसार , कंपनी टेक्स्ट अपडेट करण्यासाठी विकेंद्रित सोशल नेटवर्क शोधत आहे. यामुळे क्रिएटर्स आणि सार्वजनिक व्यक्ती त्यांचा इंटरेस्ट शेअर करू शकतात. सध्या तरी मेटा या नवीन अॅपची डेव्हलपमेंट सुरु केली आहे की नाही हे कळू शकलेले नाही. रिपोर्टच्या माहितीनुसार या अॅपवर सध्या कंपनीकडून काम सुरु आहे.
ट्विटरला टक्कर देणार मेटाचे अॅप
एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून , ट्विटर आपल्या वापरकर्त्यांना सांभाळून ठेवण्यासाठी टिकवण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहे हे स्पष्ट झाले आहे. या परिस्थितीमध्ये मेटाचे हे नवीन अॅप ट्विटरच्या अडचणी वाढवू शकते. तसेच या अॅपमुले मेटाला देखील फायदा होणार आहे. भारतात TikTok वर बंदी असताना इंस्टाग्रामने रिल्स फिचर लॉन्च केले होते. या फीचरला इंस्टाग्राम वापरकर्ते सार्वधिक पसंती देतात.
P92 चे फीचर्स
P92 मध्ये अनेक चांगले फीचर्स उपलब्ध असणार आहे असे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. यामध्ये क्लिकेबल लिंक्स, वापरकर्त्यांची प्रोफाइल, इमेज आणि व्हिडीओ तसेच इतर वापरकर्त्यांना लाईक आणि फॉलो करता येणार आहे. मात्र याच्या पहिल्या टप्प्यात वापरकर्ते इतरांच्या पोस्टवर कमेंट करू शकतात की नाही हे अद्याप कळू शकलेले नाही.