Instagram Threads Launch: Meta कंपनी गेले काही दिवस ट्विटरला टक्कर देण्यासाठी Threads अॅप लॉन्च करण्याची तयारी करत होती. अखेर मेटाने अधिकृतपणे आज Threads अॅप लॉन्च केले आहे. हे अॅप ट्विटरला टक्कर देणार आहे. एलॉन मस्क यांच्या ट्विटरला टक्कर देण्यासाठी हे अॅप लॉन्च करण्यात आले आहे. हे App वापरकर्त्यांना फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर फॉलो करत असलेल्या अकाउंट्सना परवानगी देईल. याशिवाय वापरकर्त्यांना इन्स्टाग्रामवरील युजरनेम ठेवण्याची देखील परवानगी देईल.
Threads अॅप हे नवीन असले तरी इन्स्टाग्रामच्या ब्रॅंडिंग आणि संरचना याच्या अंतर्गत येते. ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यात सहजपणे लॉग इन करता येते आणि कोणत्याही अडचणींशिवाय आपलया मित्रांना शोधू शकतात. थ्रेडस इन्स्टाग्रामचे टेक्स्ट आधारित संभाषण App आहे. हे App लोकांना एकत्रित येण्याची आणि त्यांना आजच्या महत्वाच्या प्रत्येक गोष्टीवर आणि उद्या काय ट्रेडिंग असेल याबद्दल चर्चा करण्याची परवानगी देते. याबाबतचे वृत्त ndtv ने दिले आहे.
अॅप्लिकेशनच्या वर्णनामध्ये सांगण्यात आले, ”Threads हे असे अॅप आहे जिथे लोकं त्यांच्यासाठी महत्वाचे आणि उद्या कोणते विषय ट्रेडिंग असतील यावरच चर्चा करण्यासाठी एकत्रित येतात. तुम्हाला कोणत्याही गोष्टींमध्ये स्वारस्य असो, तुम्ही तुमच्या आवडत्या निर्मात्यांना आणि त्याच गोष्टीची आवड असणाऱ्या अन्य लोकांना फॉलो करू शकता किंवा त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकता.”
इन्स्टाग्राम थ्रेड्स कसे डाउनलोड करायचे?
१. सर्वात प्रथम iOS वापरकर्त्यांनी अॅप स्टोअर आणि Android वापरकर्त्यांनी प्ले स्टोअर ओपन करावे.
२. अॅप स्टोअरवर तुमच्या स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे असलेल्या सर्चवर क्लिक करावे. सर्च बारवर क्लिक करून टॅप करून त्यात Instagram थ्रेड्स टाईप करावे.
३. अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी प्ले स्टोअरवर स्क्रीनच्या वरील बाजूस असलेल्या बारवर टॅप करून Instagram थ्रेड्स सर्च करावे.
४. अॅप्लिकेशनचा आयकॉन हा काळ्या रंगांवर पांढऱ्या रंगाचे @ असे चिन्ह असलेला आहे. थ्रेड्स अॅपवर टॅप करावे.
५. आयफोन वापरकर्त्यांसाठी Threads डाउनलोड आणि इंस्टॉल करण्यासाठी ‘GET’ वर टॅप करावे.
६. अँड्रॉइड वापरकर्त्यांनी केवळ इंस्टॉल बटणावर क्लिक करावे.
इन्स्टाग्राम थ्रेड्ससाठी साइन अप कसे करायचे ?
१. थ्रेड्स App इंस्टॉल केल्यांनतर ते ओपन करावे आणि तुमच्या Instagram अकाउंटसह साइन इन करण्यासाठी लॉग इन विथ इन्स्टाग्राम बटणावर क्लिक करावे.
२. तुम्ही इन्स्टाग्रामवरून IMPORT बटणावर क्लिक करून इन्स्टाग्रामवरील तुमची प्रोफाइल इम्पोर्ट करू शकता. तसेच तुम्ही सुरुवातीपासून इन्स्टाग्राम थ्रेड्सवर आपले प्रोफाइल देखील तयार करू शकता. प्रत्येक आयकॉनवर टॅप करून मॅन्युअल रूपात बायो,लिंक आणि प्रोफाइल पिक्चर एंटर करावे. ते झाल्यावर नेक्स्ट बटणावर क्लिक करावे.
३. यामध्ये तुम्ही तुमचे अकाउंट हे पब्लिक हवे की प्रायव्हेट हवे हे निवडू शकता.
४. तुम्ही इन्स्टाग्रामवर फॉलो केलेल्या लोकांची यादी तुम्हाला तिथे दिसेल. थ्रेड्सवर त्या सर्वांना फॉलो करण्यासाठी फॉलो ऑल बटणावर टॅप करा.
५. फक्त तुम्हाला हव्या असलेल्या लोकांना फॉलो करण्यासाठी तुम्ही लोकांच्या नावांपुढील फॉलो बटणावर टॅप करू शकता.
६. जॉईन Threads वर टॅप करा.