एलॉन मस्क हे Twitter चे कार्यकारी अध्यक्ष आहेत. त्यांनी ट्विटरची खरेदी केल्यापासून कंपनीत अनेक बदल केले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी
मस्क यांनी सोशल मीडिया साईटवर वापरकर्ते किती पोस्ट वाच शकतात यावर तात्पुरती मर्यादा जाहीर केली आहे. ही मर्यादा जाहीर केल्यानंतर ट्विटरला टक्कर देण्यासाठी फेसबुक , इंस्टाग्रामची मूळ कंपनी असलेल्या Meta ने मायक्रोब्लॉगिंग Threads App लॉन्च करण्याची तयारी करत आहे.
मेटा App लॉन्च करण्याची तयारी करत असल्याची बातमी तेव्हा समोर येत आहे जेव्हा ट्विटरने वापरकर्त्यांवर काही प्रतिबंध घातले आहेत. ट्विटरने घातलेल्या प्रतिबंधाप्रमाणे TweetDeck चा वापर करण्यासाठी व्हेरीफाईड अकाउंट असणे आवश्यक केले आहे. म्हणजेच ज्या वापरकर्त्यांकडे ब्लू टिक नसेल ते वापरकर्ते ट्विटडेक वापरू शकणार नाहीत. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.
काय आहे Threads अॅप ?
Apple अॅप स्टोअर लिस्टिंगनुसार Threads इंस्टाग्राम टेक्स्ट आधारित संभाषण App गुरूवार म्हणजे च ६ जुलै रोजी लॉन्च होण्याची शक्यता आहे. तसेच हे App वापरकर्त्यांना फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर फॉलो करत असलेल्या अकाउंट्सना परवानगी देईल. याशिवाय वापरकर्त्यांना इंस्टाग्रामवरील युजरनेम ठेवण्याची देखील परवानगी देईल.डेटा स्क्रॅपिंगला संबोधित करण्यासाठी मस्क यांच्या नवीन घोषणांमुळे ट्विटर वापरकर्त्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मेटाने गुगल प्ले स्टोअरवर लॉन्चबद्दल टिप्पणीसाठी रॉयटर्सने केलेल्या विनंतीला मेटाने त्वरित प्रतिसाद दिला नाही.
दरम्यान, ट्विटर आपल्या वापरकर्त्यांसाठी रोज नवनवीन निर्णय जाहीर करत आहे. काही दिवसांपूर्वी ट्वीटरने ज्यांच्याकडे ब्लू टिक नाही त्यांच्यासाठी पोस्टची संख्या निश्चित केली होती. तर आता कंपनीने ब्लू टिकशिवाय ट्विटडेक वापरण्यावर बंदी घातली आहे. एलॉन मस्क यांनी घेतलेल्या या निर्णयाला तीव्र विरोध होत असून, वापरकर्ते आता ट्विटरला पर्याय शोधण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमध्ये मेटाचे हे App लॉन्च करणे कंपनीसाठी फायदेशीर ठरू शकते.