WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या वापरकर्त्यांसाठी कंपनी सारखे नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स लॉन्च करत असते. नुकतेच मूळ कंपनी असलेल्या मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांसाठी इन्स्टंट व्हिडीओ हे फिचर आणले आहे. जे वापरकर्त्यांना त्यांच्या चॅटमध्ये लहान आकाराचे व्हिडीओ मेसेज सेंड आणि रिसिव्ह करण्यास परवानगी देते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हॉट्सअ‍ॅपवरील व्हिडीओ मेसेज फिचर सर्व वापरकर्त्यांसाठी सादर केले जात आहे. येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये App अपडेटसह सर्वांसाठी हे फिचर उपलब्ध होईल असं कंपनीचे म्हणणे आहे. एकदा का हे फिचर उपलब्ध झाले व्हिडीओ मेसेज वापरकर्त्यांना ६० सेकंदांमध्ये चॅटला प्रतिसाद देण्यासाठी रिअल टाइम प्रदान करतील. स्नॅपचॅट प्रमाणेच, प्लॅटफॉर्मवरील पारंपारिक व्हिडिओ फीचरच्या तुलनेत व्हिडिओ जलद आणि संभाषणासाठी अधिक अनुकूल असतील. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.

हेही वाचा : टेक्स्ट आणि व्हॉईस मेसेजप्रमाणेच आता WhatsApp वर पाठवता येणार व्हिडीओ मेसेज, लॉन्च झाले ‘हे’ फिचर

”एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे असेल, चांगली बातमी सांगणे असेल किंवा एखादा विनोद सांगायचा असेल.” इन्स्टंट व्हिडीओ मेसेज हे आपले मित्र आणि कुटुंबासह काही आपले खास क्षण शेअर करण्याचा एक मजदार आणि सोपा मार्ग आहे. असे मेटा म्हणते. हे फिचर आता सुरू करण्यात आले आहे. येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ मेसेज कसे पाठवायचे?

१. सर्वात प्रथम व्हॉट्सअ‍ॅप ओपन करावे. त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीला व्हिडीओ मेसेज पाठवायचा असेल त्याच्या चॅटवर जावे.

२. टेक्स्ट फिल्डच्या बाजूला मायक्रोफोन आयकॉनवर क्लिक करा.

३. मायक्रोफोन आयकॉन व्हिडीओ आयकॉनमध्ये बदलेल. तुमचा व्हिडीओ मेसेज रेकॉर्ड सुरु करण्यासाठी व्हिडीओ कॅमेरा आयकॉनवर क्लिक करा.

४. व्हिडीओ मेसेज रेकॉर्ड करण्यासाठी बटण थोडा वेळ प्रेस करावे.

हेही वाचा : सॅमसंग लवकरच लॉन्च करणार ‘Galaxy Ring’; जाणून घ्या काय असणार खास फीचर्स

५. तुम्ही रेकॉर्डिंग लॉक करण्यासाठी आणि तुमचे हात मोकळेठेवण्यासाठी वरील बाजूस स्वाईप देखील करू शकता.

६. रेकॉर्डिंग थांबवायच्या वेळेस प्रेस केलेले बटण सोडावे किंवा खालील बाजूस स्वाईप करावे.

७. तुमचा व्हिडीओ मेसेज तुम्ही पाठवत असलेल्या व्यक्तीला सेंड केला जाईल.

८. चॅट मध्ये व्हिडीओ मेसेज उघडले की म्यूटवर ऑटोमॅटिक प्ले होतील.

९. आवाज सुरु करण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करावे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meta launch video meesage feature for whatsapp users how to record and send videos tmb 01