Meta Launches Edits Video Editing App : आपल्यातील अनेक जण आज कन्टेन्ट क्रिएटरच्या क्षेत्रात उतरताना दिसत आहेत. दिवसभरात आपण काय करतो याची छोटीशी झलक मिनी ब्लॉगद्वारे, इन्स्टाग्राम रील्सद्वारे दाखवली जाते. पण, हे सगळे छोटे छोटे क्षण एकत्र करून दाखविण्यासाठी तो व्हिडीओ एडिटसुद्धा करावा लागतो. तर आजकाल लॅपटॉपर नाही, तर मोबाईलमध्येच व्हिडीओ एडिट करतात. तुम्हाला मोबाईलवर व्हिडीओ एडिट करायला आवडत असेल, तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण- आता इन्स्टाग्रामने व्हिडीओ एडिट करणाऱ्यांचा विचार करून एक खास अ‍ॅप आणले आहे.

मेटाने टिकटॉकच्या कॅपकटप्रमाणेच एडिट्स (Edits) हे व्हिडीओ एडिटिंग ॲप सादर केले आहे. एडिट्स हे एक मोफत ॲप आहे, जे तुमच्या विचारांना इन्स्टाग्राम रील्समध्ये रूपांतरित करण्यासाठी विविध फीचर्ससुद्धा देते. हे ॲप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध असणार आहे.

जानेवारीमध्ये अमेरिकेने टिकटॉक आणि कॅपकटवर बंदी घालण्याची घोषणा केली तेव्हा मेटाने पहिल्यांदा एडिटस् लाँच करण्याची घोषणा केली होती. कॅपकट भारतात कधीही उपलब्ध नव्हते. पण, ते अमेरिकन युजर्समध्ये एक लोकप्रिय व्हिडीओ एडिटिंग ॲप होते. ॲप बंदीमुळे एक पोकळी निर्माण झाली असती, ज्याचा फायदा घ्यायचा, असे इन्स्टाग्रामने ठरवले.

कोणत्याही वॉटरमार्कशिवाय त्यांचे प्रोजेक्ट एक्स्पोर्ट करण्याची परवानगी (Meta launches Edits App)

इन्स्टाग्राम एडिटस् ॲप युजर्सना फोनच्या कॅमेऱ्याचा वापर करून फुटेज कॅप्चर करण्याची आणि कोणत्याही वॉटरमार्कशिवाय त्यांचे प्रोजेक्ट एक्स्पोर्ट करण्याची परवानगी देतो. हे ॲप क्लिप-लेव्हल प्रिसिजन, ऑटो-एनहान्स टूल्स व एआय इमेज ॲनिमेशन यांसारख्या फीचर्ससह अचूक नियंत्रणसुद्धा देईल. ते क्रिएटर्सना ट्रेंड समजून घेण्यास आणि त्यानुसार व्हिडीओ तयार करण्यास मदत करण्यासाठी कन्टेंटसुद्धा देईल.

थर्ड-पार्टी व्हिडिओ एडिटिंग ॲप्सव्यतिरिक्त एडिट्स युजर्सना मेटाच्या लायब्ररीमधून गाणे ॲक्सेस करण्याची परवानगी देईल. थ्रेड्सप्रमाणेच एडिट्स वापरण्यासाठी युजर्सचे इन्स्टाग्राम अकाउंट असणे आवश्यक आहे. त्यामुळे एका क्लिकवर परफॉर्मन्स ट्रॅक करणे आणि कन्टेन्ट इन्स्टाग्रामवर शेअर करणेदेखील सोपे होते.

मेटाच्या नवीन क्रिएटर टूलचा उद्देश व्हिडीओ एडिटिंगसाठी दुसऱ्या ॲपवर न जाता इन्स्टाग्राममध्येच सोय करून देणे असा असणार आहे. येत्या काळात ॲपला कीफ्रेम्स, ॲडव्हान्स मोडिफिकेशन व कोलॅब्रेशन टूल्स यासारखी फीचर्स मिळतील. भविष्यातील रिलीजमध्ये आणखी सुधारणा अपेक्षित आहेत.