गेल्या काही महिन्यांपासून AI मध्ये अनेक बदल दिसून आले. एवढंच काय तर अनेक मोठ्या कंपन्यानी AIला आपल्या वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये समाविष्ट करण्यास सुरू केली आहे. यावर आता ‘मेटा’ने AI ला घेऊन एक नवं मॉडेल जारी केलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या खास मॉडेलद्वारे ‘मेटा’नं ११०० पेक्षा जास्त भाषांमध्ये ‘स्पीच टू टेक्स्ट’ आणि ‘टेक्स्ट टू स्पीच’ हे AI मॉडेल आणलंय. याला MMS (Massively Multilingual Speech) असंही म्हणतात. या मॉडेलचा जगभरातील भाषा जपणं, हा मुख्य उद्देश आहे.

हेही वाचा : LinkedIn वर जॉब शोधणे होणार अधिक सोपे! या नव्या टूलमुळे फसवणुकीला लागणार लगाम, एकदा वाचाच…

विशेष म्हणजे या मॉडेलमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषेची आकडेवारी १०० हून १,१०० पर्यंत वाढवली आहे. सोबतच हे मॉडेल ४००० पेक्षा अधिक बोलीभाषांना ओळखूसुद्धा शकतं.

कसं काम करणार हे मॉडेल?

हे मॉडेल बनवताना ‘मेटा’समोर हजारहून अधिक भाषांचे ऑडिओ डाटा एकत्र करणं, हे खूप मोठे आव्हान होतं. यावर उपाय म्हणून कंपनीनं MMS प्रोजेक्टद्वारा १,१०० पेक्षा अधिक भाषांमध्ये न्यू टेस्टामेंटच्या रीडिंगचा डेटासेट बनविला आहे.

हा डेटा एका विशिष्ट डोमेनचा आहे, जो सहसा पुरुषी आवाजात वाचला जातो पण या मॉडेलमध्ये ‘मेटा’ दोन्ही पुरुष आणि महिला आवाजाचा वापर केला जाणार आहे.

हेही वाचा : Wi-Fi Speed : तुमच्या ‘या’ चुकांमुळे Wifi चं स्पीड होतं कमी? ‘या’ गोष्टी चुकूनही करू नका…

‘मेटा’नं मशीन लर्निंगद्वारे डेटावर काम करण्यासाठी पूर्वप्रक्रिया सुरू केली आहे. डेटामधील चुका कमी करण्यावर त्यांचा भर आहे. या प्रक्रियेत चुकीचा डेटा काढण्यात येणार आणि मॉडेलमध्ये जास्तीत जास्त अचूकता आणली जाणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meta new ai model speech to text and text to speech for over 1100 languages know more about mms project ndj