Facebook हे एक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. काही वर्षांपूर्वी या फेसबुकमध्ये Inbox हा ऑप्शन होता ज्यातून वापरकर्ते एकाच वेळी फेसबुकही वापरू शकत होते आणि लोकांशी संवाद साधू शकत होते. २०१४ मध्ये फेसबुकने अॅपमधून इनबॉक्स हा पर्याय काढून टाकला होता. त्यानंतर फेसबुक आणि मेसेंजर या दोन अॅप्सची स्वतंत्रपणे जाहिरात केली होती. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी तेव्हा सांगितले होते की, या निर्णयामुळे लोकांना चांगला अनुभव मिळेल. मात्र आता जवळपास दहा वर्षानंतर फेसबुक लवकरच अॅपमध्ये इनबॉक्स हा ऑप्शन पुन्हा आणू शकते.
फेसबुक आणि मेसेंजर हे दोन्ही स्वतंत्र असल्यामुळे वापरकर्त्यांना फेसबुकवरील आलेले मेसेज पाहण्यासाठी मेसेंजर अॅपची गरज लागत होती. मेटाच्या या निर्णयामुळे त्यांना २ वेगवेगळी अॅप्स वापरायला लागू नये म्हणून अनेक वापरकर्त्यांनी Facebook Lite वापरायला सुरुवात केली. पण आता जवळपास १० वर्षांनंतर फेसबुक पुन्हा अॅपवर इनबॉक्सचा पर्याय आणण्याचा विचार करत आहे.
सुप्रसिद्ध सोशल मीडिया विश्लेषक Matt Navarra यांनी एक ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये फेसबुक लोकांना नवीन चॅटिंगचा अनुभवाची टेस्टिंग घेण्यास सांगत आहे. लवकर मेसेंजरला फेसबुकसह कनेक्ट केले जाऊ शकते असे कंपनीने ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे. मात्र या नवीन चॅट ऑप्शनमध्ये वापरकर्त्यांना कोणते फीचर्स मिळतील आणि ते कधीपासून मिळतील याबद्दल माहिती समोर आलेली नाही. मेसेंजर फेसबुकसह इंटिग्रेट झाल्यास वापरकर्ते तिथून त्यांच्या इनबॉक्समध्ये प्रवेश करू शकतील.
फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी अलीकडेच फेसबुक आणि इंस्टाग्रामसाठी पेड सर्व्हिसची घोषणा केली होती. सध्या ही सेवा काही देशांमध्ये सुरु करण्यात आली आहे. तसेच कंपनीने नुकतेच रिल्स निर्मात्यांसाठी रिलची मर्यादा ६० वरून ९० सेकंद इतकी करण्यात आली आहे.