Meta Announces Layoffs : मेटा कंपनीने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲपच्या कर्मचाऱ्यांना नारळ देण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडिया ॲपच्या दिग्गजांनी माहिती दिली की, कंपनी इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲपसह अनेक प्रमुख सहकंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना काढून (Meta Announces Layoffs) टाकणार आहे. कंपनीने २०२२ मध्ये ११ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले आणि २०२३ मध्ये सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. पण, या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये नेमके किती कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले याची संख्या अद्याप समजू शकलेली नाही. पण, खर्च कमी करण्यासाठी कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला असावा, असे सांगण्यात आले आहे.

मेटाच्या मुख्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरील युजर्सची संख्या कमी होत आहे आणि स्पर्धा वाढत आहे. म्हणजेच मेटाच्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतर प्लॅटफॉर्म्सवरील वापरकर्त्यांची संख्या कमी होत आहे (Meta Announces Layoffs) टा आणि त्यांच्याशी स्पर्धा करणाऱ्या इतर कंपन्या वाढत आहेत, असे सांगण्यात येत आहे. कंपनीवर युजर्सच्या डेटाच्या प्रायव्हसी (गोपनीयतेच्या) हाताळणीबाबतही टीका झाली आहे. कंपनीने व्हर्च्युअल, ऑग्मेंटेड रिअॅलिटी प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. याचा अर्थ, मेटा वापरकर्त्यांच्या माहितीच्या सुरक्षेवर चांगली कामगिरी करीत नाही आणि त्यांच्या नवीन तंत्रज्ञानात खूप पैसे गुंतवत आहे.

Notices issued to 400 employees for absenteeism on Republic Day Legislative Secretariat takes action Mumbai new
प्रजासत्ताकदिनी गैरहजर ४०० कर्मचाऱ्यांना नोटीस, विधिमंडळ सचिवालयाची कारवाई
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
US-based company shuts down without notice Mass layoffs
Mass layoffs : अमेरिकेतील कंपनीने पूर्वसूचना न देता गुंडाळलं भारतातील कामकाज! हजारो कर्मचार्‍यांना मिळाले नोकरीहून काढल्याचे ईमेल
Indian Engineers
“एक कोटी रुपये पगार दिला तरी भारतीय इंजीनिअर्स आठवड्यातून सहा दिवस…” IITian सीईओची टीका
Mohandas Pai
“सीईओंना ५० कोटी रुपये पगार देता पण…”, इन्फोसिसचे माजी अधिकारी म्हणाले, “आयटी इंडस्ट्रीमध्ये फ्रेशर्सचे शोषण”
job opportunity in indian oil corporation and clerk recruitment in mumbai high court
नोकरीची संधी: इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये संधी
IT Company, IT , IT Company Jobs,
‘आयटी’तील बेरोजगारांचे लोंढे अन् त्यामागील अमानवीय चेहरा…
ICC CEO Geoff Allardice to step down ahead of Champions Trophy 2025
ICC CEO Geoff Allardice : पाकिस्तानातील मैदानांच्या तयारीचा घोळ भोवला? सीईओ ज्योफ एलार्डिस यांनी दिला तडकाफडकी राजीनामा

हेही वाचा…Affordable Jio Phones : रिचार्जपेक्षा कमी किमतीत जिओचा फोन, जिओ सिनेमा, जिओ पे यांचा करता येईल वापर; वाचा फीचर्स

मला अजूनही विश्वास बसत नाही…

त्याचबरोबर सुप्रसिद्ध इंजिनीयर व सोशल मीडिया तज्ज्ञ जेन मंचुन वोंग यांनी थ्रेड्सवर पोस्ट लिहिले, “मला अजूनही विश्वास बसत नाही. पण, मला माहिती देण्यात आलीय की, मला काढून टाकण्यात आलं आहे. मेटा येथील माझ्या प्रवासाबद्दल मी सर्वांचे आभार मानते. विशेषत: थ्रेड्स आणि इन्स्टाग्राम टीममेट्सचे. जर कोणालाही सॉफ्टवेअर / सुरक्षा इंजिनीयरबाबत एकत्र काम करण्यास स्वारस्य असेल, तर कृपया माझ्या वैयक्तिक वेबसाइटवर नमूद केलेल्या ईमेल, लिंक्डइन इत्यादीद्वारे माझ्याशी संपर्क साधा,” अशी माहिती तिने पोस्टद्वारे दिली आहे.

मेटा कंपनीत काही बदल केले जात आहेत. दीर्घकालीन धोरणात्मक उद्दिष्टे आणि स्थान रणनीतीत ताळमेळ बसविण्याच्या उद्देशाने हा निर्णय (Meta Announces Layoffs) घेण्यात आला आहे. त्यामध्ये काही टीम्सना वेगवेगळ्या ठिकाणी हलविले जाणार असून, काही कर्मचाऱ्यांची भूमिका बदलण्यात येणार आहे. आम्ही प्रभावित कर्मचाऱ्यांना इतर संधी शोधण्यासाठी प्रयत्न करू, असे मेटाच्या निवेदनात म्हटले आहे, असे कंपनीचे प्रवक्ते डेव्ह अर्नोल्ड यांनी ‘द व्हर्ज’ला सांगितले.

Story img Loader