Meta Removes Instagram Accounts: सेक्सटॉर्शन हा एक सायबर गुन्हा वा फसवणूक आहे. इंटरनेटच्या जगात आपण सहजच एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोलण्यास सुरुवात करतो. चॅटिंगच्या माध्यमातून सुरू झालेली ही ओळख एकमेकांना मोबाईल नंबर देण्यापर्यंत कधी पोहोचते हे कळतही नाही. नंतर हळूहळू कॉल, मग व्हिडीओ कॉल सुरू होतात आणि मग कधी कधी याचे रूपांतर प्रेम व आकर्षण यांसारख्या भावनांमध्ये होते. नंतर मग त्यातूनच नग्न (न्यूड) प्रतिमांची अदलाबदल किंवा व्हिडीओ कॉलद्वारे विचित्र चाळे आदी अनेक गोष्टींना खतपाणी घातले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

६३ हजार इन्स्टाग्राम (Instagram) खाती बंद करण्याचा निर्णय:

तर याचसंबंधित टेक कंपनी मेटाने बुधवारी एक निर्णय घेतला आहे आणि तब्बल ६३ हजार इन्स्टाग्राम अकाउंट मेटाने लॉक (काढून टाकली) आहेत. हे प्रकरण आफ्रिकन देश नायजेरियामध्ये सुरू असलेल्या घोटाळ्याशी संबंधित आहेत. त्यामुळे पश्चिम आफ्रिकन देशातील अधिकाऱ्यांनी मेटा कंपनीला २२० डॉलर्सचा दंडही ठोठावला होता.

मेटा कंपनीने काढून टाकलेल्या इन्स्टाग्राम अकाउंटमध्ये २,५०० प्रोफाइल्स आणि २० लोकांच्या गटांचा समावेश आहे. काही १,३०० फेसबुक अकाउंट, २०० फेसबुक पेजेस व ५,७०० फेसबुक ग्रुप्स काढून टाकण्यात आले आहेत. हा समूह व्यक्तींना अश्लील फोटो पाठवण्यासाठी धमकावत असे, तसेच पैशाची मागणीही करीत असे, तसेच पीडित व्यक्तीने पैसे न दिल्यास तो फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देण्याचा कट या समूहाकडून रचला जाई. तसेच या प्रकरणात त्यांनी अमेरिकेतील प्रौढ पुरुषांना लक्ष्य केलं आणि त्यांची ओळख लपवण्यासाठी बनावट खाती वापरली. जेव्हा समूह प्रौढांना लक्ष्य करण्यात अयशस्वी ठरला, तेव्हा त्यांनी किशोरांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली, असे मेटा कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा…Apple Watch For Kids: तुमचा चिमुकला कुठे आहे हे आता ॲपलचं घड्याळ सांगेल; कसं कराल सेट? स्टेप्स पाहून घ्या

ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२३ दरम्यान होमलँड सिक्युरिटी तपासणी १३०० अहवाल समोर आले आहेत; ज्यात लैंगिक शोषणाचा समावेश आहे. त्यात १२,६०० बहुतेक मुले (किशोरवयीन) होती; ज्यांचा अमेरिकेत रहिवास होता. या प्रकरणामुळे २० लोकांनी आत्महत्या करायला भाग पाडले आहे.

एफबीआयने जानेवारीमध्ये दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सेक्सटॉर्शनचे अनेक गुन्हेगार जेरिया आणि आयव्हरी कोस्ट यांसारख्या पश्चिम आफ्रिकन देशांमध्ये किंवा फिलिपिन्ससारख्या दक्षिण पूर्व आशियाई देशांमधले असतात. यासंबंधित नायजेरियामध्ये दोन पुरुषांना अटक करण्यात आली होती. कारण- ऑस्ट्रेलियन किशोरवयीन मुलाने त्यांना ५०० डॉलर्स ($330) न दिल्यास ‘मुलाचे वैयक्तिक फोटो’ सार्वजनिक करण्याची धमकी देण्यात आली आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला गेला. ऑस्ट्रेलियन पोलिसांनी सांगितले, ‘सेक्सटॉर्शन’ घोटाळ्यातील संशयितांनी धमकी दिल्यानंतर मुलाने आत्महत्या केली.

मेटा करतंय नवीन फीचरवर काम :

वाढते गुन्हे रोखण्यासाठी, मेटाने एप्रिलमध्ये घोषणा केली की, ते किशोरवयीन मुलांचे संरक्षण करण्यासाठी एआय जनरेटेड ‘न्यूड प्रोटेक्शन’ फीचरची चाचणी घेत आहेत. हे फीचर किशोरवयीन मुलांना इन्स्टाग्रामवरील अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजपासून वाचवण्याचे काम करते. असे गुन्हे रोखण्यासाठी META कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींसोबत काम करीत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meta removes 63 thousand instagram accounts involved in sextortion scams deleted accounts included 2500 profiles group of 20 people asp