WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून आपण एकमेकांशी चॅट, व्हिडिओ कॉल्सद्वारे संवाद साधू शकतो. यामध्ये तुम्हा अनेक फीचर्स वापरायला मिळतात. तसेच आपल्या वापरकर्त्यांना हे प्लॅटफॉर्म सहज वापरता यावे म्हणून नवनवीन फीचर्स सादर करत असते. आताही व्हाट्सअॅप एक नवीन फीचर घेऊन आले आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना व्हाट्सअॅप वापरणे आणखीन सोपे होणार आहे. हे फिचर कोणते आहे आणि हे कसे वापरावे हे जाणून घेऊयात.
तुम्हाला WhatsApp आणि Facebook स्टेटस अपडेट करण्यासाठी वेगवेगळे स्टेटस शेअर करावे लागले नाहीत तर किती छान होईल. WhatsApp सध्या अशाच एका फीचरवर काम करत आहे. ज्यामुळे वापरकर्ते App मधून बाहेर न पडताच आपले स्टेट्स अपडेट फेसबुक स्टोरीजमध्ये शेअर करून शकणार आहेत.
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, नवीन फीचरमुळे दोन्ही प्लॅटफॉर्मवर स्टेटस अपडेट्स शेअर करणे अधिक सोपे होणार आहे. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांना नवीन पोस्ट करताना मॅन्युअली शेअर करावे लागणार नाही. सध्या वापरकर्त्यांना इन्स्टाग्रामवर हे फिचर वापरता येते. यामध्ये इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले स्टेटस फेसबुकवरही शेअर केले जाऊ शकतात.
रिपोर्टनुसार हे नवीन फीचर वापरकर्त्यांना WhatsApp स्टेट्सच्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये उपलब्ध असणार आहे. यामध्ये तुम्हाला फेसबुक अकाउंट अड्डकर्ता येणार आहे. हे फीचर वापरकर्त्यांना ऍक्टिव्हेट करावे लागणार आहे. या फीचरमुळे वापरकर्त्यांच्या वेळ वाचण्यास मदत होणार आहे. हे फिचर अँड्रॉइड आणि iOs वापरकर्त्यांसाठी देण्यात येणार आहे.