Xiaomi ने Mi Fan Festival 2022 सेल भारतात सुरू केला आहे, जो Mi.com वर लाइव्ह करण्यात आला आहे. ६ एप्रिल ते १२ एप्रिल २०२२ पर्यंत चालेल. या दरम्यान चिनी कंपनीचे फोन, टीव्ही, लॅपटॉप आणि इतर उपकरणांवर मोठी सूट दिली जात आहे. या प्रोडक्ट्सवर कमाल २९,००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. पण, SBI क्रेडिट कार्ड वापरून १० टक्क्यांपर्यंत आणखी सूट मिळू शकते.

या स्मार्टफोन्सवर डिस्काउंट उपलब्ध आहेत
९,९९९ रुपयांचा Redmi 9i Sport फोन ७,६४९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. Redmi 10 वर ५,१०० रुपयांची सूट आहे, जी ९८९९रुपयांना खरेदी करता येईल.

Redmi Note 11 वर ७००० सूट
तुम्ही २००० रूपयांच्या सूटसह Redmi 9A Sport स्मार्टफोन ६२९९ मध्ये खरेदी करू शकता. Redmi Note 11 वर ७००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे, जी ११,६९९ रुपयांना खरेदी करता येईल. तुम्ही ६००० रू.च्या सवलतीसह १८,९९९ रूपयांमध्ये Redmi Note 11 Pro + 5G मिळवू शकता.

आणखी वाचा : iPhone 12 वर मिळतोय तगडा डिस्काउंट, जाणून घ्या तुम्ही किती रुपयांना खरेदी करू शकता

Xiaomi 11T Pro 5G वर १६ हजारांची सूट
तसंच, तुम्ही Xiaomi 11i 5G सारखे प्रीमियम फ्लॅगशिप हँडसेट २०,९९९ रूपयांमध्ये ११ हजारांच्या सूटसह खरेदी करू शकता. तुम्ही Xiaomi 11i Hypercharge 5G हा २२,९९९ रूपयांमध्ये खरेदी करू शकता, ज्यावर ९००० रूपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय, तुम्ही Xiaomi 11 Lite NE 5G २०,९९९ रुपयांना १३,००० रुपयांच्या सूटसह खरेदी करू शकता. तसंच तुम्ही Xiaomi 11T Pro 5G हा स्मार्टफोन ३३,९९९ रुपयांना १६ हजारांच्या सूटसह खरेदी करू शकता.

टीव्हीवर १३ ते २९ हजार रुपयांपर्यंत सूट
वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, Redmi Smart TV ३२ इंच ११,९९९ रुपयांना खरेदी करता येईल तर Redmi Smart TV ४३ इंच २४,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. Redmi Smart TV ३२ वर १३००० रूपये आणि Redmi Smart TV X43 वर १८००० रूपयांची सूट दिली जात आहे. त्याचप्रमाणे, तुम्ही २७,४९९ रूपयांच्या कमाल सूटसह Mi TV 5X सिरीज खरेदी करू शकता.

लॅपटॉपवर किती डिस्काउंट मिळत आहे
RedmiBook 15 लॅपटॉप ३२,४९९ रुपयांना खरेदी करता येईल. तुम्ही RedmiBook 15 Pro ४२,९९९ रूपयांमध्ये, Mi Notebook Pro ५०,९९९ रूपयांमध्ये आणि Mi Notebook Pro Ultra ५३,९९९ रूपयांमध्ये खरेदी करू शकता.

कृपया लक्षात घ्या की, डिव्हाइसेसच्या किमतींवरील सूट Mi.com वर पोस्ट केलेल्या किमतींवर आधारित आहे. तसंच कंपनी SBI क्रेडिट कार्डने केलेल्या खरेदीवर १० टक्क्यांपर्यंत झटपट सूट दिली जात आहे.