Xiaomi ने आपला नवीनतम फिटनेस बँड Mi Smart Band 7 Pro लॉन्च केला आहे. Xiaomi चा हा फिटनेस बँड NFC सपोर्ट सह Xiaomi 12S सीरीज स्मार्टफोनसह चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. नवीनतम Xiaomi Smart Band 7 Pro मध्ये १.६४ इंच एमोलेड डिस्प्ले पॅनेल देण्यात आलं आहे. हा स्मार्ट फिटनेस बँड ५ ATM वॉटर रेझिस्टन्ससह सादर करण्यात आला आहे आणि तो जीपीएस सपोर्टमध्ये तयार करण्यात आला आहे. Xiaomi चा दावा आहे की Mi Smart Band 7 Pro ला २३५mAh बॅटरीचे समर्थन आहे जे एका चार्जवर १२ दिवसांपर्यंत बॅकअप देते. नवीनतम Mi Smart Band 7 Pro फिटनेस ट्रॅकरची विक्री या आठवड्यापासून चीनमध्ये सुरू होईल. चला तर मग जाणून घेऊया फिटनेस बँडबद्दल सविस्तर माहिती.

Xiaomi च्या Mi Band मालिकेतील फिटनेस ट्रॅकर भारतातही खूप लोकप्रिय आहे. सध्या, कंपनीने Mi Smart Band 7 Pro च्या भारतातील लाँचबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तरी सुद्धा मिळालेल्या माहितीनुसार, हा फिटनेस ट्रॅकर भारतात कंपनीच्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या Mi Smarter Living कार्यक्रमात सादर केला जाऊ शकतो.

( हे ही वाचा: UPI पिन कसा बदलायचा? जाणून घ्या सर्वात सोपा मार्ग)

Xiaomi Mi Smart band 7 Pro ची किंमत

Xiaomi Mi Smart Band 7 Pro फिटनेस बँड काळ्या आणि पांढऱ्या या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. या फिटनेस बँडचा पट्टा सहा रंगांच्या पर्यायांमध्ये आणि दोन विशेष लेदर टेक्सचर पर्यायांमध्ये देण्यात आला आहे. चीनमध्ये चामड्याच्या पट्ट्यांची किंमत CNY ५९ म्हणजेच भारतात अंदाजे ७०० रुपये आहे. यासोबतच Xiaomi Mi Smart Band 7 Pro चीनमध्ये CNY ३९९ म्हणजे भारतात जवळपास ४,७०० रुपये आहे. तथापि, पहिल्या विक्रीदरम्यान, Xiaomi चा फिटनेस ट्रॅकर CNY ३७९ म्हणजे सुमारे ४५०० रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.

Xiaomi Mi Smart Band 7 Pro ची वैशिष्ट्ये

  • १.८४ इंच एमोलेड डिस्प्ले
  • बिल्ट- इन जीपीएस
  • NFC
  • ११७ क्रीडा मोड
  • ५ ATM वाटर रजिस्टेंस
  • २३५ mAh बॅटरी
  • १२ दिवसांची बॅटरी

( हे ही वाचा: BSNL चे ५ सर्वोत्कृष्ट रिचार्ज प्लॅन! जाणून घ्या सविस्तर माहिती)

Xiaomi Mi Smart Band 7 Pro मध्ये १.६४ इंचाचा एमोलेड पॅनेल आहे, ज्याचे रिझोल्यूशन २८०×४५६ पिक्सेल आहे. हा डिस्प्ले ऑलवेज ऑन सपोर्टसह येतो. शाओमीच्या या फिटनेस ट्रॅकरमध्ये वापरकर्त्यांना १८० बिल्ट इन वॉच फेसचा सपोर्ट मिळतो. यासोबतच या फिटनेस ट्रॅकरमध्ये GPS, NFC, GLONASS, Galileo, Beidou आणि QZSS यांचा सपोर्ट आहे. Xiaomi Mi Smart Band 7 Pro फिटनेस ट्रॅकरमध्ये ११७ स्पोर्ट्स मोड आहेत. तसंच आरोग्य ट्रॅकिंग सेन्सर जसे की SpO2 सेन्सर, हृदय गती आणि स्लीप मॉनिटर दिलेले आहेत. हा फिटनेस बँड ५ATM वॉटर रेझिस्टन्स रेटिंगसह लॉन्च करण्यात आला आहे. Xiaomi च्या घड्याळाला २३५mAh बॅटरीचा पाठिंबा आहे, ज्यामध्ये कंपनीचा दावा आहे की बँडला एका चार्जवर १२ दिवसांचा बॅकअप मिळतो.

Story img Loader