मायक्रोसॉफ्टचे विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम जगात मोठ्या प्रमाणात वापरले जाते. सध्या विंडोज ११ २२ एच २ हा कंपनीचा नवा अपडेट ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आला होता. मात्र, त्यामुळे काही गेमिंग आणि अॅपसंबंधी समस्या निर्माण झाल्याने कंपनीने Windows 11 22 H 2 या नव्या अपडेटचे वितरण तात्पुरते थांबवले आहे.
नव्या अपडेटमधील काही त्रुटींमुळे गेम्स आणि अॅपच्या कामगिरीवर परिणाम होत आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी अपडेटवर काम चालू असून उपकरणांमध्ये हा अपडेट न टाकण्याचा सल्ला कंपनीकडून देण्यात आला आहे.
(ड्रोन टॅक्सीने करता येणार मजेदार प्रवास, पॅरिसमध्ये झाली चाचणी, पाहा व्हिडिओ)
विंडोज ११ २२ एच २ वर काही गेम्स आणि अॅप अडखळू शकतात किंवा त्यांच्यापासून अपेक्षित कामगिरी मिळणार नाही, असे कंपनीने आपल्या अधिकृत ब्लॉगपोस्टवर म्हटले आहे. प्रभावित गेम्स आणि अॅप्स चुकून जीपीयू परफॉर्मेन्स डीबगिंग फीचर सुरू करत आहेत, जे युजरला वापरण्यासाठी देण्यात आलेले नाही, त्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रभावित झालेले प्लाटफॉर्म क्लाइटच्या बाजूने असून यामुळे सर्व्हरवर परिणाम झाले नसल्याचे कंपनीने सांगितले.
सुरक्षेसाठी समस्येमुळे प्रभावित झालेल्या उपकरणांना नवा अपडेट देण्याचे किंवा ते इन्सटॉल होत असल्यास त्यास स्थगित करण्यात आले आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
कंपनीने सूचवला हा आहे उपाय
कंपनी समस्येवर काम करत असून तिने लवकरच स्टेबल व्हर्जन आणणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तोपर्यंत कंपनीने समस्या दूर करण्याचा मार्ग सूचवला आहे.
(OPPO A1 PRO १६ नोव्हेंबरला होणार लाँच, १०८ एमपी कॅमेरासह काय असेल खास? जाणून घ्या)
तुम्ही आधीच Windows 11 22 H 2 अपडेट मिळवले असेल आणि तुम्हाला समस्या जाणवत असेल तर गेम्स आणि त्याच्याशी संबंधित अॅप अपडेट करून ही समस्या सोडवली जाऊ शकते, असे मायक्रोसॉफ्टने आपल्या ब्लॉग पोसटमध्ये म्हटले आहे. मात्र, गेम्स कसे अपडेट करायचे याबाबत माहिती नसल्यास युजरला गेम आणि अॅपच्या डेव्हलपरचा सल्ला घ्यावा लागेल, असा सल्ला देत बहुतेक अॅप उघडताच किंवा स्टोअरद्वारे आपोआप अपडटे होतील, असे मायक्रोसॉफ्टने सांगितले आहे.
मॅन्युअली अपडेट करू नका
समस्या सुटेपर्यंत ‘अपडेट नाऊ’ बटन किंवा मीडिया क्रिएशन टूलचा वापर करून मॅन्युअली अपग्रेड करू नका, असा सल्ला मायक्रोसॉफ्टने दिला आहे.