मायक्रोसॉफ्टने आपली नवीन सबस्क्रिप्शन सेवा Microsoft 365 Copilot ची घोषणा केली आहे. जी वर्ड, एक्सेल आणि टीम्ससारख्या लोकप्रिय ऑफिस प्रॉडक्ट्समध्ये AI क्षमता जोडणार आहे. सध्या अनेक ठिकाणी AI चा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. चॅटजीपीटी लॉन्च झाल्यानंतर अनेक कंपन्या आपले AI चॅटबॉट लॉन्च केले आहेत. ही सबस्क्रिप्शन सेवा $३० दर महिना च्या अतिरिक्त खर्चासह येईल. ज्यामुळे ग्राहकांसाठी महिन्याच्या किंमतीमध्ये ८३ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. या सबस्क्रिप्शन सेवेमधून अतिरिक्त महसूल मिळवणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
Microsoft Copilot वापरकर्त्यांना येणारे ईमेलचे रँकिंग, मिटिंगची समरी, स्प्रेडशीट डेटाचे विश्लेषण, लिखाणाचे प्रॉम्प्ट देणे , प्रझेंटेशनचे डिझाईन करणे अशा AI सुविधांचा फायदा घेण्यास मदत करेल. ज्यामध्ये ईमेल,कॅलेंडर,चॅट आणि डॉक्युमेंट्सचा समावेश आहे. Copilot Microsoft 365 साठी मायक्रोसॉफ्ट वापरकर्त्यांना आश्वस्त करतो की त्यांची सुरक्षा, गोपनीयता आणि पॉलिसी या धोरणांचे पालन करतो. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
मायक्रोसॉफ्टने आपल्या सार्वजनिक रोलआऊटसाठी विशिष्ट अशी टाइमलाइन जाहीर केलेली नाही आहे. मात्र सध्या गुडइअर आणि जनरल मोटर्ससह ६०० एंटरप्राइझ ग्राहकांकडून सेवेची चाचणी केली जात आहे. ही सबस्क्रिप्शन सेवा मायक्रोसॉफ्टच्या त्याच्या ऑफिस सॉफ्टवेअरचा संच वाढवण्याच्या आणि AI ला त्यांच्या वर्कफ्लोमध्ये एकत्रित करू पाहणाऱ्या व्यवसायांना अधिक आकर्षक बनवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
Microsoft 365 Copilot सुरुवात अशा वेळी झाली आहे जेव्हा मायक्रोसॉफ्ट, गुगल आणि IBM सारख्या दिग्गज टेक्नॉलॉजी कंपन्या जनरेटिव्ह AI टूल्स ऑफर करण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. व्यवसायांना AI फीचर्ससह डॉक्युमेंट्स , ईमेल तयार करणे आणि एक्सेलचे विश्लेषण सुलभता प्रदान करणे हे उद्दिष्ट कंपनीच्या या नवीन सेवेचे आहे.
या सबस्क्रिप्शन सेवेसाठी दरमहिना $३० (अंदाजे २,४६३.८३ रुपये) मोजावे लागणार आहेत. उदाहरणार्थ, Microsoft 365 E3 चे सबस्क्रिप्शन घेतलेल्या व्यवसायांची किंमत जवळजवळ दुप्पट होईल आणि Microsoft 365 बिझनेस स्टँडर्डसाठी, खर्च जवळजवळ तिप्पट होईल.