मायक्रोसॉफ्ट कंपनी लवकरच एक भन्नाट ॲप घेऊन येत आहे. मायक्रोसॉफ्टने आयफोन, आयपॅडसाठी विंडोज ॲप लाँच केले आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने विंडोज आणि वेब ब्राउजरसाठी उपलब्ध असलेले विंडोज ॲप आयओएस (iOS), आयपॅडओस (iPadOS), मॅकओएससाठी (macOS)सुद्धा लाँच करते आहे. हे ॲप रिमोट पीसी (Remote Pcs), अझूर व्हर्च्युअल डेस्कटॉप (Azure Virtual Dekstop), विंडोज ३५६ (Windows 365), मायक्रोसॉफ्ट डेव्ह बॉक्स (Microsoft Dev Box) व मायक्रोसॉफ्टच्या रिमोटसह (Microsoft Remote dekstop service) विविध स्रोतांकडून विंडोज प्रवाहित करण्यासाठी काम करते.

मायक्रोसॉफ्टने लाँच करण्यात आलेले हे विंडोज ॲप विविध मॉनिटर्स (Multiple Moniters), कस्टम डिस्प्ले रिझोल्युशन (Custome Display Resolutions) व स्केलिंग (Scaling), तसेच वेबकॅम (Webcam), स्टोरेज डिव्हायसेस (Storage Devices) व प्रिंटर (Printer)सारख्या सर्व मॉनिटर्सना सपोर्ट करते.मायक्रोसॉफ्ट कंपनीने स्पष्ट केले आहे की, हे विंडोज ॲप विविध प्लॅटफॉर्मवर आणि उपकरणांवर जसे की, डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्टफोन व वेब ब्राउजरद्वारे विविध प्रकारच्या डिव्हायसेसवर वापरले जाऊ शकते. डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर वेब ब्राउजर वापरताना, तुम्ही कोणतेही सॉफ्टवेअर डाउनलोड आणि इन्स्टॉल (Install) न करता कनेक्ट करू शकता.

deepseek safe use
अमेरिकन कंपन्यांची झोप उडवणारे ‘डीपसीक एआय’ वापरणे सुरक्षित आहे? जाणून घ्या चीनच्या चॅटबॉटविषयी महत्त्वपूर्ण गोष्टी
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Alphonso Mangoes arrived in APMC market Navi Mumbai
एपीएमसीत हापूस दाखल
Ola, Uber govt notices
Ola, Uber Govt Notices : iPhone वापरता की अँड्रॉइड याचा कॅबच्या भाड्यावर फरक पडतो? केंद्राच्या नोटीशीनंतर ओला, उबरने दिलं उत्तर
Artificial Intelligence Might Enable Communication with Animals
‘जंगल मंगल विद्यापीठा’त कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद भरते तेव्हा…
Centres Notice to Ola, Uber : iPhone आणि अँड्रॉइड फोन वापरणाऱ्यासांठी आकारलं जातंय वेगवेगळं भाडं? ओला, उबर कंपन्यांना केंद्र सरकारची नोटीस
Image Of Vijay Shekhar Sharma
“iPhone 16 मध्ये इतका वाईट कॅमेरा कसा काय?”, पेटीएमच्या संस्थापकांची पोस्ट व्हायरल
sambhav
भारतीय लष्कर वापरत असलेला संभव स्मार्टफोनमध्ये कोणत्या खास गोष्टी आहेत? जाणून घ्या…

हेही वाचा… आता इन्स्टाग्रामवर ‘क्लोज फ्रेंड्स’ लिस्टसह ‘या’ गोष्टीसुद्धा होणार शेअर… पाहा काय होणार बदल

विंडोज ॲप (Windows App) एक होम स्क्रीनसह डिझाईन केलेले आहे. तुम्ही एकाच ठिकाणी बसून, अनेक सर्व्हिसेस (Services)वरून रिमोट पीसीवर (Remote Pcs), विंडोज (Windows) ॲक्सेस करू शकता आणि तुमच्या आवडीचे ॲप पिन (Pined) करू शकता. आणि जर तुम्ही एकापेक्षा अधिक खाती वापरत असाल, तर तुम्ही विंडोज ॲपच्या सोप्या स्विचिंग वैशिष्ट्यांसह तुमचे खाते सहजपणे स्विच करू शकता, असे कंपनीने तिच्या ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले आहे.

लाँच करण्यात आलेले हे ॲप सध्या फक्त मॅकओएस (macOS), आयओएस (iOS) व आयपॅडओएस (iPadOS) व वेब ब्राउझरवर उपलब्ध असेल. हे ॲप मायक्रोसॉफ्टच्या व्यवसाय खात्यांच्या श्रेणीपुरते मर्यादित आहे आणि भविष्यात ग्राहकांसाठी याची उपलब्धता वाढवण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.मायक्रोसॉफ्टने विंडोज ॲपचा उपयोग कसा करावा हे पुढीलप्रमाणे सांगितले आहे. विंडोज ॲपचा (Windows App) उपयोग करण्यासाठी तुमचे डिव्‍हाइस इंटरनेटशी कनेक्‍ट असणे, तुमच्‍याकडे युजर अकाउंट (User Account) असणे आणि तुमच्‍या ॲडमिनिस्ट्रेटरने (administrator) तुम्‍हाला डिव्‍हाइस किंवा अ‍ॅप असाईन करून दिलेले असावे.

Story img Loader