जगातील बलाढ्य टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट Office 365 चे नाव बदलणार असून कंपनी त्याचे नाव मायक्रोसॉफ्ट 365 असे ठेवणार आहे. नोव्हेंबर २०२२ पासून मायक्रोसॉफ्ट 365 म्हणून ओळखले जाणार आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट यासारख्या नावांमधून ऑफिस हे ब्रँडिंग काढून टाकणार असल्याचे कंपनीने मायक्रोसॉफ्ट 365 च्या FAQ मध्ये सांगितले आहे.
FAQsनुसार, करण्यात येणारे नावातील बदल पुढील महिन्यापासून होणार असून, हे बदल सर्व Windows, MacOS, iOS आणि Android डिव्हाइसेसवर दिसतील. याशिवाय कंपनी मोबाईल आणि डेस्कटॉपसाठी मायक्रोसॉफ्ट 365 नावाचे वेगळे अॅप सादर करणार असून, हे अॅप वापरकर्त्यांना नाव बदलण्याबाबतही माहिती देतील.
नव्या नावानुसार लोगो देखील बदलणार आहे. मायक्रोसॉफ्टकडून करण्यात येणारे लोगो ते डिझाइनमधील बदल केवळ Microsoft 365 मधील अॅप्सना लागू होणार आहेत. Word, Excel, PowerPoint, Teams, Outlook, Clipchamp, Stream आणि Designer ची नावे आणि ब्रँडिंग जुन्या पद्धतीसारखेच असणार आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये, Microsoft 365 आमच्या फ्लॅगशिप उत्पादकता सूटमध्ये विकसित झाला आहे, म्हणून आम्ही Microsoft 365 मधून जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी एक अनुभव तयार करत आहोत. येत्या काही महिन्यांत, Office.com, Office मोबाइल अॅप आणि विंडोजसाठी ऑफिस अॅप मायक्रोसॉफ्ट 365 अॅप बनेल, नवीन आयकॉन, नवीन लुक आणि आणखी वैशिष्ट्यांसह, ते असेल, असे FAQ मध्ये सांगितले आहे.