मायक्रोसॉफ्ट कंपनीचे वर्डपॅड हे ॲप्लिकेशन अनेक गोष्टींसाठी उपयोगी आहे. त्याचा तुम्ही एखादी इंग्रजी किंवा मराठी भाषेतील स्क्रिप्ट लिहून, ती एडिट करून सेव्हसुद्धा करू शकता. वर्डपॅडमध्ये दिल्या जाणाऱ्या मेन्यू व फीचरचा वापर करून टेक्स्ट अलाइनमेंट, फॉन्ट, फॉन्ट इफेक्ट व रंगाचा वापर करून डॉक्युमेंटची आकर्षकरीत्या फॉरमॅटिंग पूर्ण करता येते. परंतु, आता मायक्रोसॉफ्ट कंपनीने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९९५ पासून चालत आलेल्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममधील मुख्य ॲप्लिकेशन ‘वर्डपॅड’ (WordPad) काढून टाकण्यात येणार आहे, अशी मायक्रोसॉफ्टची योजना आहे. टेक कंपनी वापरकर्त्यांना मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि विंडोज नोटपॅडसारखे पर्याय वापरण्यास सुचवणार आहे .

हेही वाचा…मोटोरोलाने भारतात लाँच केला हा ५ जी स्मार्टफोन! फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळणार… किंमत फक्त

मायक्रोसॉफ्ट कंपनीने सांगितले आहे की, आता वर्डपॅड अपडेट केले जात नाही. म्हणून आगामी विंडोजच्या नवीन सीरिजमध्ये वर्डपॅड नसेल आणि वापरकर्त्यांकडून प्ले स्टोअरमधून ते पुन्हा इन्स्टॉलसुद्धा केले जाऊ शकत नाही. तसेच हे ॲप काढून टाकल्यानंतर अनेक वापरकर्त्यांची गैरसोय होईल. पण, कंपनी मायक्रोसॉफ्टच्या वर्ड (Microsoft Word) व नोटपॅडचा (Notepad) उपयोग करण्याची आणि त्याचा अनुभव घेण्याची संधी वापरकर्त्यांना देत आहे; ज्यात अधिक चांगले फीचर्स असणार आहेत.

मायक्रोसॉफ्टने १९९५ पासून त्यांच्या प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीममध्ये वर्डपॅड ॲप्लिकेशन प्रदान करण्यास सुरुवात केली. सध्या ते Windows 11 मध्येही उपलब्ध आहे. यासंबंधीची माहिती Windows Insider च्या Windows 11 Canary Channel बिल्डमध्ये देण्यात आली होती. येत्या काळात वापरकर्त्यांचा अनुभव आणखीन खास करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने हा निर्णय घेतला आहे आणि नोटपॅडच्या जागी मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि विंडोज नोटपॅड वापरण्याचे पर्याय दिले आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Microsoft operating system since 1 5 may soon remove this old word pad application from computers asp
Show comments