ऑपरेटिंग सिस्टिम बनवण्यात आघाडीवर असलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपला नवा टॅबलेट ग्राहकांसाठी लाँच केला आहे. Microsoft Surface Pro 9 असे या टॅबचे नाव आहे. मायक्रोसॉफ्टने अपग्रेड केलेले प्रोसेसर आणि काही नवीन रंग पर्यायांसह हा टॅब लाँच केला आहे. ग्राहकांना टॅब इन्टेल आणि एआरएम पावर्ड व्हर्जनमध्ये घेता येईल. या टॅबमध्ये कोणती वैशिष्ट्ये आहेत आणि त्याची किंमत काय, याबाबत जाणून घेऊया.
सर्फेस प्रोम ९ मध्ये आहेत हे फीचर
मागील व्हर्जनच्या तुलनेत या टॅबमध्ये अपग्रेडेड प्रोसेसर देण्यात आले आहे. यामध्ये इन्टेल आणि एआरएम प्रोसेसरवर आधारीत प्रोसेसर देण्यात आले आहे. युजरला दोन पर्याय देण्यात आले आहे. युजर सर्फेस प्रो ९ चे वायफाय मॉडेल इन्टेल प्रोसेसरसह घेऊ शकतो. किंवा सर्फेस प्रो ९ ५जी आणि मायक्रोसॉफ्ट एसक्यू ३ प्रोसेसरसह मिळेल.
मायक्रोसॉफ्ट एसक्यू ३ च्या सीपीयूची कामगिरी स्नॅपड्रॅगन ८ सीएक्स जेन २ प्रोसेसरच्या तुलनेत ८५ टक्के वेगावान राहिल आणि जीपीयूची कामगिरी ६० टक्के वेगवान राहील, अशी खात्री क्वालकॉमकडून मिळते. वायफाय मॉडेल ३२ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोअरेजसह मिळतो, तर ५ जी व्हेरिएंट १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोअरेज सपोर्ट करते.
सर्फेस प्रो ९ मध्ये १३ इंचसह २८८०x१९२० रेझोल्यूशन देणारा पिक्सेल सेन्स डिस्प्ले देण्यात आला आहे. सर्फेस प्रो ९ वायफाय व्हेरिएंटमध्ये इन्टेल वायफाय ६ ई आणि ब्ल्युटूथ ५.१ देण्यात आले आहे. तर ५ जी व्हेरिएंट इन्टेलमध्ये वायफाय ६ ई, ब्ल्यूटुथ ५, जीपीएस, ग्लोनास, बाईडू, नॅनो सिम आणि ई सीम सपोर्ट करते.
सर्फेस प्रोची बॅटरी लाईफ १५.५ तास, तर सर्फेस प्रो ९ ५जीची बॅटरी लाईफ १९ तास असल्याचा दावा मायक्रोसॉफ्टने केला आहे. दोन्ही व्हेरिएंटमध्ये १० मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.
इतकी आहे किंमत
सर्फेस प्रो ९ चे दोन्ही व्हेरिएंट या महिन्यापासून ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत. नवीन सर्फेस मॉडेल घेण्यासाठी प्री ऑर्डर घेणे सुरू झाले आहे. १२ जेन इन्टेल आय ५ सर्फेस प्रो ९ वायफाय मॉडेल ज्यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते त्याची किंमत जवळपास ८२ हजार २८० रुपये असणार आहे. तर १२ जेन इन्टेल आय ७ प्रोसेसरसह १६ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोअरेज असलेला सर्फेस प्रो ९ जवळपास १ लाख ३१ हजार ६०० रुपयांत मिळणार आहे. कमर्शियल वापरासाठी १२ जेन इन्टेल आय ५, आय ७ प्रोसेसरसह वरील रॅम आणि स्टोअरेजसह टॅबची किंमत ८ हजार २०० रुपये अधिक असणार आहे.
(लघुग्रहांपासून पृथ्वीला मिळणार सुरक्षा, NASA ची ‘ही’ चाचणी ठरली यशस्वी)
सर्फेस प्रो ९ ५जी मॉडेल हे वायफाय मॉडेलपेक्षा महाग आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोअरेजसह हे व्हेरिएंट जवळपास १ लाख ६ हजार ९०० रुपयांना मिळणार आहे. तर कर्मर्शियल टॅबलेटची किंमत जवळपास १ लाख १५ हजार १०० रुपये इतकी असणार आहे. ५ जी व्हेरिएंट प्लाटिनम रंगामध्ये मिळणार आहे, तर वायफाय व्हेरिएंट प्लाटिनम, ग्राफाईट, सफायर आणि फॉरेस्ट रंगामध्ये उपलब्ध असणार आहे.