Microsoft Windows Outage : मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने जगभरातील यूजर्सना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. अनेकांचे संगणक आणि लॅपटॉप अचानक बंद पडत असून त्यावर निळ्या रंगाची स्क्रीन दिसत आहे. यामुळे जगभरातील बॅंका आणि विमानतळांचं कामदेखील खोळंबलं आहे. महत्त्वाचे म्हणजे मायक्रोसॉफ्टनेही या घटनेची दखल घेतली असून याबाबत आम्ही माहिती घेत असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.

पोस्ट शेअर करत यूजर्सनी केली तक्रार

एक्स या समाजमाध्यावर पोस्ट शेअर करत अनेक यूजर्सने याबाबत तक्रार केली आहे. काम करत असताना अचानक त्यांचे लॅपटॉप बंद पडत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच तुमचा संगणक अडचणीत असून रिस्टार्ट करणे आवश्यक आहे, असे संदेश स्क्रीनवर येत असल्याचेही या यूजर्सने सांगितले आहे. क्राऊड स्क्राइक अपडेटनंतर येत आहे, ही समस्या येत असल्याची तक्रारही काही यूजर्सद्वारे करण्यात करण्यात आली आहे.

Smart quality control system
कुतूहल: स्मार्ट वाहनांसाठी स्मार्ट गुणवत्ता नियंत्रण प्रणाली
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
All Women Service Centre by Schwing Stetter
Schwing Stetter : आता सिमेंट मिक्सरची पिवळी यंत्रे महिला दुरुस्त करणार; वाचा कोणत्या कंपनीने घेतला निर्णय, नेमका प्रयोग काय?
Smart Phone News
Smart Phone : iPhone की अँड्रॉईड सुरक्षेच्या दृष्टीने कुठला फोन आहे खास?
Coldplay Book My Show
Coldplay Ticket : “तिकिटांचा काळा बाजार…”, कोल्ड प्ले तिकिट विक्रीवरून बुक माय शोवर टीका झाल्यानंतर कंपनीने दिलं स्पष्टीकरण!
sensex
‘एनएसई’ने महत्त्वाकांक्षी ‘टी ०’ व्यवहार प्रणालीची अंमलबजावणी पुढे ढकलली
airtel ai based network solution on spam
एअरटेलने सादर केली भारतातील पहिली AI आधारित नेटवर्कची स्पॅम शोध प्रणाली: ग्राहकांना मिळणार रीअल-टाइम अ‍ॅलर्ट्स!
list of four jio recharge plans
Jio recharge plans : ‘या’ चार रिचार्जवर मिळणार मोफत सबस्क्रिप्शन; किंमत ११०० रुपयांपेक्षा कमी

हेही वाचा – Xiaomi Smart Umbrella: यंदाच्या पावसाळ्यासाठी स्मार्ट छत्री; मोबाईलसारखी टचस्क्रीन आणि बरंच काही, जाणून घ्या फीचर्स!

मायक्रोसॉफ्टनेही घेतली दखल

दरम्यान, मायक्रोसॉफ्टने या तक्रारींची दखल घेतली आहे. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत मायक्रोसॉफ्टने यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने जगभरातील संगणक आणि लॅपटॉप प्रभावित झाले आहेत. आम्ही याची दखल घेतली असून याबाबत माहिती घेत आहोत. लवकर ही सेवा पूर्ववत करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे कंपनीने म्हटलं आहे.

हेही वाचा – Frozen Future मृत्यूनंतर शरीर गोठवण्याचा ट्रेण्ड अब्जाधीशांमध्ये का रूढ होतोय? खरंच माणूस परत जिवंत होणार?

क्राऊडस्ट्राईककडून निवेदन जारी

क्राऊडस्ट्राईकने यासंदर्भात निवेदन जारी केलं आहे. आम्ही या तक्रारींची माहिती घेत असून जोपर्यंत पुढील सुचना येत नाही, तोपर्यंत वाट यूजर्सनी वाट बघावी, असे त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे. याबरोबरच विंडोजवर चालणाऱ्या संगणकांमध्ये बीएसओडीची समस्या निर्माण झाली असून यूजर्सनी स्वत:हून या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू नये, अशी सुचनादेखील त्यांनी केली आहे.

विमान व बॅंकींग सेवा प्रभावित

मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत झालेल्या या बिघाडाचा फटका भारतासह जगभरातील बॅंका आणि विमान सेवेलाही बसला आहे. मुंबईसह देशभरातील अन्य काही महत्त्वाच्या विमानतळांवर सर्व्हर ठप्प झाल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रवाशांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. स्पाईसजेटनेही विमानसेवा ठप्प झाल्याचे म्हटलं आहे. विमानसेवेबरोबरच बॅंकांचे व्यवहारदेखील ठप्प झाले आहेत.