Microsoft Windows Global : जागतिक ख्यातीच्या मायक्रोसॉफ्ट या आयटी कंपनीचा सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे जगभरातील विमानतळाचे काम ठप्प झाले आहे. भारतातील दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, पुणे आणि मुंबईतील विमानतळावरील कामांना मोठा फटका बसला आहे. फक्त विमानतळच नाही तर विविध क्षेत्रातील व्यवसाय, बँक, टेलिकॉम कंपन्या, टीव्ही आणि रेडिओ ब्रॉडकास्ट सेवांना विंडोजच्या ब्लू स्क्रिन एरररचा सामना करावा लागत आहे. विंडोजची ऑपरेटिंग सिस्टिम बंद झाल्यामुळे यावर अवलंबून असलेले सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत.

बोर्डिंग पास हाताने लिहून देण्याची वेळ

विमान प्रवासाचे बुकिंग आणि चेक-इन सेवा बंद झाल्यामुळे एअर इंडिया, इंडिगो, आकसा एअरलाईन्स आणि स्पाइसजेटची सेवा खंडीत झाली आहे. काही एअरलाईन्सनी प्रवाशांना हाताने लिहिलेले बोर्डिंग पास देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे त्यांनी प्रवाशांना विमानतळावर लवकर पोहोचण्याची विनंती केली आहे. हाताने बोर्डिंग पास देण्याची पद्धत कम्प्युटर प्रचलित होण्याआधी वापरली जात होती. आता पुन्हा एकदा हाताने बोर्डिंग पास लिहिण्याची वेळ आली आहे.

Mumbai Municipal Corporation Debris on Call service for household level construction waste collection goes online Mumbai
घरगुती स्तरावरील बांधकामाचा कचरा वाहून नेण्यासाठी मुंबई महापालिकेची ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवा ऑनलाईन
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Flipkart Cancellation Fee Rule Charges
Flipkart Cancellation Fee : ऑनलाइन ऑर्डर रद्द करताच पैसे द्यावे लागणार? फ्लिपकार्टचा ‘हा’ नियम जुना, वाचा कंपनी काय म्हणते
Six people arrested for smuggling gold worth Rs 10 crore Mumbai news
दहा कोटींच्या सोन्याच्या तस्करीत सहा जणांना अटक; तीन आरोपी विमानतळावरील कर्मचारी
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार रद्द, कारण काय? याचा काय परिणाम होणार?
uber shikara
‘Uber’ने आता बोटसुद्धा बुक करता येणार; उबरने सुरू केलेली नवीन सेवा काय आहे?

हे वाचा >> मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं!

मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रत्येक विमानाला सरासरी ५१ मिनिटांचा उशीर लागत आहे. तर दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जवळपास ४० मिनिटांचा उशीर लागत आहे. दरम्यान एअर इंडियाने सांगितले की, मायक्रोसॉफ्टच्या समस्येमुळे त्यांच्या सेवेत तात्पुरत्या काळापुरता व्यत्यय आला होता.

स्पाइसजेट या परवडणाऱ्या एअरलाईन्सलाही तांत्रिक समस्येचा फटका बसला आहे. आमची टीम या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे, असे स्पाइसजेटकडून सांगण्यात आले आहे.

अर्जून रामपालही विमानतळावर अडकला

अभिनेता अर्जुन रामपाल हा बाहेर जाण्यासाठी आज मुंबई विमानतळावर पोहोचला होता. पण त्याचे विमान रद्द झाल्याचे त्याला सांगण्यात आले. यानंतर त्याने दुसऱ्या कंपनीचे तिकीट काढले, त्याठिकाणी विमान मिळते का? हे पाहायला चाललो असल्याची प्रतिक्रिया त्याने माध्यमांशी बोलताना दिली.

हे ही वाचा >> Microsoft Windows outage : तुमचाही लॅपटॉप शट डाऊन होतोय? जाणून घ्या कशी सोडवायची समस्या

राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?

केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, संपूर्ण जगभरात मायक्रोसॉफ्टची क्लाऊड सेवा ठप्प झाल्यामुळे अनेक सेवा बाधित झाल्या आहेत. आपल्या देशातील विमानतळाचे ग्राऊंड ऑपरेशनही यामुळे बाधित झाले आहे. पण हाताने लिहून पास दिले जात आहेत. केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालय याकडे लक्ष ठेवून आहे. केंद्र आणि डीजीसीएकडून योग्य त्या सूचना दिल्या जात आहेत.

Story img Loader