Microsoft Windows Outage Fix Laptop : जागतिक ख्यातीच्या मायक्रोसॉफ्ट या आयटी कंपनीचा सर्व्हर ठप्प झाला असून विंडोज या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये जगभरात अडचणी येत असून संपूर्ण सिस्टिम कोसळली आहे. त्यामुळे जगभरातील विमानसेवा, बँका आणि इतर सर्व ऑनलाईन सेवा ठप्प झाल्या आहेत. विडोंज ऑपरेटिंग सिस्टिम वापरणारे लाखो वापरकर्ते आता त्यांचा लॅपटॉप बंद झाल्याची तक्रार करत आहेत. नुकत्याच क्राऊड स्ट्राईक या अपडेटमुळे हे घडले असल्याचे बोलले जात आहे.

मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हिस हेल्थ स्टेटसच्या माहितीनुसार, Azure backend workloads मध्ये काही बदल केल्यानंतर स्टोरेज आणि कंम्प्युट रिसोर्समध्ये आता व्यत्यय निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणून मायक्रोसॉफ्ट ३६५ या ऑपरेटिंग सिस्टिमवर अवलंबून असलेल्या सर्व सेवा ठप्प झाल्या आहेत.

Infosys Q3 Results Highlight: Net profit rises 11 percent
इन्फोसिसला ६,८०६ कोटींचा तिमाही नफा; ११ टक्क्यांची अपेक्षेपेक्षा सरस वाढ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
A group of people looking at stock market data on a screen.
Hindenburg : हिंडनबर्ग रिसर्च बंदची घोषणा अन् अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये उसळी; BSE वर अदाणी पॉवर, ग्रीन एनर्जी तेजीत
overseas debt become expensive due to the depreciating rupee
रुपयाच्या अवमूल्यनामुळे परदेशातून कर्ज उभारणी महाग
Stock market today BSE Sensex crashes over 1000 points
मुंबई शेअर बाजार हजार अंशांनी कोसळला; डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन विक्रमी नीचांकावर
Why FIIs are selling
Stock Market Crash: १० दिवसांमध्ये FII’s नी २२,२५९ कोटी रुपयांचे भारतीय शेअर्स का विकले? वाचा ६ कारणे…
Torres Scam Case, Assets seized, Torres ,
टोरेस घोटाळा प्रकरण : नऊ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
share market fraud loksatta news
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४४ लाखांची फसवणूक

हे वाचा >> मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं!

क्राऊडस्ट्राईक अभियंत्याकडून सदर समस्येचे मूळ शोधून आता त्यावरील बदल करण्यास सुरुवात केली आहे. ज्यांच्या मशीन बंद झाल्या आहेत, त्यांनी यापुढे काय करावे? यासाठीच्या सूचना विंडोजकडून देण्यात आल्या आहेत.

Microsoft outage मधून मार्ग काढण्यासाठी हे करू शकता?

१. सेफ मोडमध्ये जाऊन विंडोज Boot करा

२. C:\Windows\System32\drivers\CrowdStrike directory यावर नेव्हिगेट करा

३. C-00000291*.sys ही फाईल वरील फोल्डरमध्ये शोधून ती डिलीट करा.

४. पुन्हा Boot करा.

सेवा ठप्प झाल्यानंतर मायक्रोसॉफ्टने काय सांगितले?

मायक्रोसॉफ्टने एक्सवर सविस्तर पोस्ट करून ही समस्या का उद्भवली आणि त्यावर काय उपाययोजना केल्या जात आहेत. याची माहिती दिली. त्यांनी सांगितले, मायक्रोसॉफ्टच्या ३६५ ॲप्स आणि सेवा वापरताना युजर्सना अडचणी येत आहेत. आम्ही या समस्येचा तपास करत आहोत. ही समस्या सोडविण्यासाठी आम्ही पर्यायी यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न करत आहोत. पर्यायी यंत्रणा उभारताना त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. या समस्येवर उपाय शोधत असून युजर्सच्या अडचणी हळुहळु कमी होतील.

Story img Loader