Microsoft New Keyboard: मायक्रोसॉफ्ट हे आज तंत्रज्ञान जगतात खूप प्रसिद्ध नाव आहे. या कंपनीने जगभरात संगणकाची लोकप्रियता शिखरावर नेली. तर आता जवळपास ३० वर्षांनंतर लॅपटॉप आणि संगणकाच्या कीबोर्डमध्ये महत्वपूर्ण बदल केले आहेत. ‘कोपायलट’ (Copilot) या आपल्या एआय (AI ) टूलला लाँच करण्याबरोबरच कंपनीने हा नवीन कीबोर्ड सादर केला आहे. हा नवीन बदल मायक्रोसॉफ्ट वापरकर्त्यांसाठी खास ठरणार आहे.

कोपायलटचा उपयोग : कोपायलट तुम्ही केलेल्या वर्णनानुसार फोटो तयार करू शकते. ईमेल ड्राफ्ट्स किंवा इतर कोणत्याही कन्टेंट पॉलिश करून देऊ शकते. तुम्हाला तुमच्या आवडीच्या विषयाची माहिती शोधण्यास मदत करू शकते. तुमची मायक्रोसॉफ्ट विंडोज अद्ययावत आहे आणि त्यात Copilot सक्षम आहे हे लक्षात घेऊन, तुम्ही Windows + C दाबून Copilot ला बोलावू शकता.

Young boy bite dog video viral on social media shocking and funny video
VIDEO…अन् ‘तो’ चक्क कुत्र्याला कचाकचा चावला; हल्ला करताच रागावलेल्या तरुणानं घेतला बदला, पण शेवट…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Viral video of a man carries a snake to the hospital after it bites him
सापाने दंश केला तरी जगण्याची इच्छा सोडली नाही, रुग्णालयात सापाला घेऊन आला अन्…, VIDEO पाहून माणसाच्या हिमतीला कराल सलाम
desi jugaad room heater made of brick
देसी जुगाड! थंडीपासून वाचण्यासाठी पठ्ठ्याने विटेपासून बनवला रुम हीटर; Video पाहून युजर्स शॉक, म्हणाले, “मृत्यूला…”
Anil Ambani Company Banned
Anil Ambani: अनिल अंबानींना मोठा धक्का; रिलायन्सच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी, शेअर गडगडले
Viral video of a friend putting firecracker in their mouth on social media
आयुष्याचा खेळ करू नका! सुतळी बॉम्ब पेटवला अन् मित्राच्या तोंडात टाकला, पुढे काय घडलं? पाहा VIDEO
Viral video of a young girl dancing on a bench and fell down for a reel on social media
रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; वर्गात बेंचवर चढली अन् तरुणीबरोबर असं काही झालं की…, पाहा VIDEO
new maruti suzuki dzire trends pre bookings open varients and features new dzire on google trends
मारुतीचा मोठा धमाका! फक्त ११,००० मध्ये प्री-बूक करा ‘ही’ नवीकोरी कार, व्हेरियंट्स अन् फिचर्स पाहून व्हाल फिदा

हेही वाचा…आता तुम्ही भेट दिलेल्या वेबसाइट्सची होणार ‘या’ ॲप्समध्ये नोंद! काय आहे Meta चे नवीन फीचर?

मायक्रोसॉफ्टने विंडोज की (Windows Key ) बदलण्यासाठी कोपायलट की सादर केली आहे. ही Key कीबोर्डच्या उजव्या बाजूला Alt Key च्या बाजूला असेल. कोपायलट लोगो नवीन बटणावर देण्यात आला आहे. सध्या हे मायक्रोसॉफ्टच्या विंडोज ११ ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या काही निवडक वैयक्तिक संगणकामध्ये उपल्बध असेल. मायक्रोसॉफ्टने १९९४ मध्ये विंडोज/स्टार्ट की सादर केली होती. यानंतर ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा कंपनी कीबोर्डच्या लेआऊटमध्ये बदल करणार आहे.

कंपनीने सध्या भारतात हे उपलब्ध करून दिलेलं नाही. जर एखाद्या देशात विंडोज कोपायलट उपलब्ध नसेल तर त्याऐवजी विंडोज सर्च आणले जाईल. ‘विंडोज की’तून स्टार्ट मेन्यू उघडतो… तसेच कंपनीचे हार्डवेअर पार्टनर सीईएस (CES) टेकनॉलॉजी कॉन्फरन्समध्ये विंडोज ११ कीबोर्डमध्ये हे नवीन कोपायलट बटण सादर करतील. मायक्रोसॉफ्ट यासाठी चॅट जीपीटी मेकर ओपन आयबरोबर काम करेल. तसेच कंपनीने खुलासा केला आहे की, स्प्रिंगमध्ये लॉन्च होणार्‍या नवीन Windows 11 संगणक आणि आगामी सरफेस उपकरणांमध्ये ही Key दिसून येईल.