भारतात 5G सेवा सुरु झाली आहे. विमानतळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांसाठी एक वाईट बातमी आहे. देशातील विमानतळांजवळ राहणारे लोक २०२३ मध्येही 5G इंटरनेटचा आनंद घेऊ शकणार नाहीत. नेटवर्क भारतात ऑक्टोबर २०२२ मध्ये लाँच करण्यात आले होते, जे 4G आणि 3G पेक्षा जास्त वेगाने काम करते. या उद्योगाशी संबंधित तज्ञांचे मत आहे की, विमानतळाच्या आसपास राहणारे ग्राहक अजूनही 5G नेटवर्क वापरण्यास सक्षम नसतील आणि ही संख्या लाखोंच्या घरात आहे.
दूरसंचार विभागाने काय सांगितले?
दूरसंचार विभागाने (DoT) अलीकडेच भारती एअरटेल, रिलायन्स जीओ आणि व्होडाफोन कंपन्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात असे म्हटले आहे की, त्यांनी भारतीय विमानतळांच्या २.१ किलोमीटरच्या आत सी-बँड 5G बेस स्टेशन स्थापित करू नये, कारण, या सी-बँड 5G स्टेशनमुळे समस्या उद्भवू शकतात.
(हे ही वाचा : iPhone Fast Charging Tips: आता मिनिटांत होईल तुमचा Iphone चार्ज; फाॅलो करा ‘या’ सोप्या ट्रिक्स )
समस्या कशामुळे होऊ शकते?
दूरसंचार विभागाचा असा विश्वास आहे की, विमानाच्या रेडिओ (रडार) अल्टिमीटरसह टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान, पर्वतांमध्ये अपघात होण्यापासून वाचण्यासाठी म्हणून पायलट पूर्णपणे रेडिओ (रडार) अल्टिमीटरवर अवलंबून असतात. पत्रात असे म्हटले आहे की, दूरसंचार सेवा प्रदात्यांना ३३००-३६७० मेगाहर्ट्झमध्ये कोणतेही 5G/IMT बेस स्टेशन्स रनवेच्या दोन्ही टोकांपासून २१०० मीटर आणि भारतीय विमानतळांच्या रनवेच्या मध्य रेषेपासून ९१० मीटरच्या परिसरात स्थापित करू नयेत.
जोपर्यंत DGCA सर्व विमानांचे रेडिओ अल्टिमीटर फिल्टर बदलण्याची खात्री करत नाही, तोपर्यंत हा नवीन नियम लागू असेल. जगभरात हाय-स्पीड 5G वायरलेस नेटवर्क आणण्यापूर्वी, यूएस मधील वैमानिकांनी विमानाच्या रेडिओ (रडार) अल्टिमीटरमध्ये वारंवार समस्या नोंदवल्या आहेत.
5G बेस स्टेशन कुठे स्थापित केले आहेत?
5G बेस स्टेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, एअरटेलने ही स्टेशन्स नागपूर, बेंगळुरू, नवी दिल्ली, गुवाहाटी आणि पुणे विमानतळांवर स्थापित केली आहेत. त्यामुळे जीओने दिल्ली-एनसीआर भागात 5जी बेस स्टेशन्स उभारली आहेत.