इंटरनेटमुळे आपले आयुष्य अधिक सोपे झाले आहे. आपण घरबसल्या इंटरनेटच्या मदतीने कोणतेही काम करू शकतो. बँकेचे व्यवहार, वेगवेगळी बिल्स भरणे, अगदी महिन्याचे राशन देखील आपण मोबाईलमधून इंटरनेटच्या मदतीने मागवतो. त्यामुळे इंटेरनेटशिवाय कोणतेही काम करणे आजकाल अशक्य वाटते. पण अनेक कामांसाठी अवलंबुन असणाऱ्या इंटरनेटमुळेच फोन हॅक होऊ शकतो आणि सायबर क्राईमचे शिकार होऊ शकतो हे अनेकांना माहित नसते. सायबर क्राईमच्या जाळ्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी इंटरनेट वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या.
इंटरनेट वापरताना नेहमी या गोष्टी लक्षात ठेवा
आणखी वाचा : अनइन्स्टॉल न करता स्मार्टफोनमध्ये App Hide कसे करायचे जाणून घ्या
फ्री वायफायचा वापर टाळा
कुठेही फ्री वायफाय उपलब्ध असेल, तिथे सर्वजण स्वतःचा फोन वायफायला कनेक्ट करतात. पण यामुळे तुमचा वैयक्तिक डेटा दुसऱ्या फोनवर शेअर केला जाण्याची भीती असते, त्यामुळे फ्री वायफाय वापरणे टाळा.
अनोळखी वेबसाईट्सवर क्लिक करू नका
मोबाईलवर दररोज असंख्य वेबसाईट्सचे नोटिफिकेशन येत असतात त्यातील काही वेबसाईट्स या तुम्ही सब्सक्राईब केलेल्या असतात, तर काही अनोळखी असतात. या अनोळखी वेबसाईटवर युजर आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स देण्यात येतात. त्यामुळे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अशा लिंक्सवर क्लिक केले जाते. पण या वेबसाईट्स विश्वासार्ह नसतात यामुळे तुमचा फोन हॅक होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनोळखी वेबसाईट्सवर क्लिक करणे टाळा.
प्रत्येक अकाउंटचा एकच पासवर्ड ठेवणे टाळा
अनेकांना पासवर्ड लक्षात ठेवण्याचे टेन्शन येते, त्यामुळे ते वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट्सना एकच पासवर्ड ठेवतात. असे केल्याने जर तुमचे एक अकाउंट हॅक झाले तर त्याबरोबर सर्वच अकाउंट हॅक होऊ शकतात, त्यामुळे प्रत्येक अकाउंटचा एकच पासवर्ड ठेवणे टाळा.
आणखी वाचा : ‘ही’ ट्रिक वापरून पाहा गुपचूप Whatsapp Status; स्टेट्स ठेवणाऱ्या व्यक्तीलाही दिसणार नाही नाव
बॅकअप ऑन करा
जर कधी तुमचा फोन कधी हॅक झाला तर तुमचा सर्व डेटा डिलीट होऊ शकतो. त्यामुळे इंटरनेट वापरण्यापुर्वी नेहमी बॅकअप ऑन करा. यामुळे तुमचा डेटा फोनमध्ये सेव्ह राहील.