जर तुम्ही व्हॉट्सॲपवर चुकीची भाषा वापरत असाल तर तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट देखील ब्लॉक होऊ शकते. होय, हल्ली बरेच जणांचे व्हॉट्सॲप अकाउंट ब्लॉक झालेत. व्हॉट्सॲप प्रत्येक वेळी एक नवीन IT नियम जारी करते. यावेळी व्हॉट्सॲपने एक अहवाल जारी केला आहे जो २०२१ IT नियम अंतर्गत आहे. या अहवालांतर्गत, अयोग्य भाषा आणि अनैतिक मजकूरामुळे त्या महिन्यात किती व्हॉट्सॲप अकाऊंट्सवर बंदी घालण्यात आली याची माहिती दिली आहे. त्याच वेळी, मेटा कंपनी व्हॉट्सॲपने जारी केलेल्या शेवटच्या अहवालानुसार, कंपनीने मे २०२२ मध्ये भारतात सुमारे १.९ दशलक्ष म्हणजेच एक कोटी ९० लाख व्हॉट्सॲप खाती बंद केली आहेत. ही संख्या खूप मोठी आहे.

या नवीन अहवालाबाबत, व्हॉट्सॲपने सांगितले आहे की, “आमचे ऑपरेशन खात्यांचा गैरवापर टाळण्यासाठी तीन टप्प्यांत काम करते. प्रथम नोंदणीवर, दुसरा संदेशादरम्यान आणि तिसरा नकारात्मक अभिप्राय म्हणजे निगेटीव्ह फीडबॅक दरम्यान. यानंतर खाती वापरकर्त्यांद्वारे रिपोर्ट आणि ब्लॉक प्रतिसाद असतात जामुळे अकाउंट ब्लॉक करण्यात येतात. व्हॉट्सॲपची स्वतःची टीम आहे जी या तीन चरणांमध्ये मेसेजचे निरीक्षण करते आणि ते अधिक चांगले आणि प्रभावी बनविण्यात मदत करते.”

( हे ही वाचा: WhatsApp Data ट्रान्सफर करणे झाले आणखीच सोपे; Android वरून iPhone वर डेटा क्षणार्धात होणार कॉपी)

ज्यांच्या खात्यांवर बंदी घातली गेली आहे त्यांना त्यांचे खाते सक्रिय करण्यासाठी अपील करण्याचा अधिकार असला तरी, व्हॉट्सॲप क्वचितच त्याच्या निर्णयाच्या विरोधात खाते पुन्हा सक्रिय करते. नवीन अहवालानुसार, मे महिन्यात एकूण ३०३ खात्यांनी यासाठी अपील केले होते, परंतु त्यापैकी केवळ २३ खाती पुन्हा सक्रिय झाली. याबद्दल, व्हॉट्सॲप प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही आमचे प्लॅटफॉर्म सुरक्षित ठेवण्यासाठी आणि वापरकर्त्यांना चांगली सेवा देण्यासाठी काही इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेटा वैज्ञानिक, तज्ञ आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसह नवीन प्रक्रियांमध्ये सातत्याने गुंतवणूक केली आहे. तर नवीन अहवाल भारतीय IT कायदा २०२१ नुसार तयार केले गेले आहेत आणि आम्ही मे महिन्यासाठी आमचा अहवाल प्रकाशित केला आहे. व्हॉट्सॲपने केलेल्या कारवाईच्या आधारे वापरकर्त्यांच्या तक्रारींवर आधारित हा वापरकर्ता सुरक्षा अहवाल आहे. व्हॉट्सॲपद्वारे स्वतःच्या तपासणी कारवाईचाही समावेश आहे.

Story img Loader