ऑनलाइन ऑडिटिंग टूलने टेस्ला मोटर्सचे सीईओ आणि जगातील आघाडीचे अब्जाधीश इलॉन मस्क यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मस्क यांचे अर्ध्याहून अधिक ट्विटर फॉलोवर्स बनावट आहेत. विशेष म्हणजे जेव्हा ट्विटर ही मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट इलॉन मस्क यांनी १०० टक्के स्टिक देऊन विकत घेतल्यानंतर ही बातमी समोर आली आहे.
इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी ४४ अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. सध्या टेस्ला सीईओ इलॉन मस्क यांचे ट्विटरवर ९० दशलक्ष फॉलोअर्स आहेत. ऑनलाइन ऑडिटिंग टूल स्पार्कटोरोवर ऑडिट केलेल्या परिणामांमधून असे दिसून आले आहे की, मस्क यांचे ५३.३ टक्के फॉलोअर्स बनावट आहेत, याचा अर्थ त्यांच्या फॉलोवर्स लिस्टमध्ये बनावट किंवा असक्रिय खाती आहेत. एका वृत्तानुसार, कोणताही ट्विटर वापरकर्ता तपासणीसाठी या टूलचा वापर करू शकतो. असे असले तरीही स्पार्कटोरोने नोंदवलेले परिणाम पूर्णपणे बरोबर म्हणता येतीलच असेही नाही.
आता SBI ग्राहकांना Yono App मधूनच करता येणार LIC IPO मध्ये गुंतवणूक; जाणून घ्या तपशील
स्पार्कटोरोने द इंडिपेंडंटला सांगितले की, ऑडिटने इलॉन मस्क यांना फॉलो करणाऱ्या नवीनतम १००,००० खात्यांमधून २,००० खात्यांचे विश्लेषण केले. त्यानंतर स्पॅम/बॉट/कमी दर्जाच्या खात्यांशी संबंधित २५ पेक्षा अधिक घटक तपासले गेले. यावरून स्पार्कटोरोने आपल्या अहवालात म्हटले आहे की, इलॉन मस्क यांना फॉलो करणाऱ्या फॉलोवर्सपैकी सरासरी ४१% फॉलोअर्स बनावट आहेत.
विशेष म्हणजे, ट्विटर विकत घेण्यापूर्वी, मस्क यांनी सांगितले होते की त्यांनी स्पॅम आणि बनावट खाती बंद करण्यास सांगितले होते. मास्क यांनी २१ एप्रिल रोजी ट्विट केले, ‘जर आम्ही ट्विटर खरेदी केले, तर आम्ही स्पॅमबॉट्स काढून टाकण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न करू.’ फोर्ब्सच्या मते, मस्कची एकूण संपत्ती २६८ अब्ज डॉलर आहे.