मोटोरोला ही एक लोकप्रिय मोबाइल कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन स्मार्टफोन लॉन्च करत असते. मोटो E13 भारतात या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारीमध्ये लॉन्च झाला होता. आता कंपनीने या फोनला नवीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले आहे. हा फोन ऑक्टा कोर Unisoc T606 SoC द्वारे समर्थित आहे आणि यात ५००० mAh बॅटरी मिळते. नवीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये अधिक रॅम आणि इनबिल्ट स्टोरेज मिळते.
Moto E13: फीचर्स
मोटोच्या या फोनमध्ये वापरकर्त्यांना ६.५ इंचाचा HD प्लस IPS LCD डिस्प्ले मिळतो. याचा रिफ्रेश रेट ६०Hz आहे. हा फोन ऑक्टा-कोर Unisoc T606 SoC सह Mali-G57 MP1 GPU द्वारे समर्थित आहे. यात ८ जीबी LPDDR4x रॅम आणि १२८ जीबी इतके इनबिल्ट स्टोरेज हे मायक्रोएसडी कार्डद्वारे १ टीबी पर्यंत वाढवता येते. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.
मोटोरोलाच्या Moto E १३ या फोनमध्ये वापरकर्त्यांना १३ मेगापिक्सलचा सिंगल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट म्हणजेच सेल्फी कॅमेरा मिळतो. दोन्ही कॅमेरे हे फुल एचडी व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास एकदम चांगले आहेत. या फोनमध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी येते आणि १० वॅटचे वायर्ड चार्जिंग सपोर्ट मिळतो. हा फोन एकदा चार्ज केला की २३ तास चालतो असा कंपनीचा दावा आहे. यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, ब्लूटूथ ५.०, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि ३.५ मिमी ऑडिओ जॅक असे फीचर्स येतात.
Moto E13 : किंमत
मोटोरोला कंपनीचा Moto E १३ हा स्मार्टफोन ग्रीन, कॉस्मिक ब्लॅक आणि क्रीमी व्हाइट या रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असणार आहे. २ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत ही ६,९९९ रुपये आहे. तसेच ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत ७,९९९ रुपये इतकी आहे. तसेच कंपनीने नवीन ८ जीबी राम अणि १२८ जीबी स्टोरेज है नवीन व्हेरिवेन्ट लॉन्च केला आसन त्याची किंमत ८,९९९ रूपये असणार आहे.