मोटो इ२२ हा स्मार्टफोन भारतात १७ ऑक्टोबर रोजी लाँच होणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोटोरोलाकडुन या फोनच्या लाँचच्या तारखेबरोबर या फोनचे फीचर्स जाहीर करण्यात आले. या फोनमध्ये ९० Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले देण्यात आला आहे. ५००० mAh बॅटरी असणाऱ्या या फोनची किंमत १२,७०० रुपये आहे. या फोनमध्ये आणखी काय फीचर्स आहेत जाणून घ्या.

मोटो इ२२ फोनचे फीचर्स

  • हा फोन अँड्रॉइड १२ सिस्टीमवर बनवण्यात आला आहे.
  • या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये १६ मेगापिक्सेलचे मेन सेंसर आणि २ मेगापिक्सेलचे डेप्थ सेंसर देण्यात आले आहे.
  • यासह सेल्फी आणि व्हिडीओ कॉल साठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
  • ४ जीबी रॅम आणि ६४ जीबीचे इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.
  • फिंगरप्रिंट स्कॅनर, फेस अनलॉक अशी बायोमेट्रिक सिक्युरिटी देखील देण्यात आली आहे.
  • या फोनची बॅटरी ५००० mAh असून १०W सपोर्ट असणारी आहे.